एक्स्प्लोर

Swiggy : IPO लाँच करण्यापूर्वी स्विगीने आपले नाव बदलले, कंपनी आता 'या' नावाने ओळखली जाणार

Swiggy : फूड डिलिव्हरी ॲप स्विगीने आपले नोंदणीकृत नाव बदलले आहे. स्विगी यावर्षी आपला IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. 

नवी दिल्ली : बंगळुरुस्थित फूड अँड ग्रोसरी डिलिव्हरी ॲप स्विगीने ((Swiggy) आपले नोंदणीकृत नाव बदलले आहे. स्विगीचे त्याचे Bundl Technologies Pvt Ltd हे नाव भागधारकांच्या एका विशेष बैठकीत मंजुरी घेऊन Swiggy Pvt Ltd असं केलं आहे. स्विगी आपला आयपीओ (IPO) बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. त्या पार्श्वभूमीवर कंपनीने नाव बदलल्याची माहिती समोर येत आहे. 

बंगळुरुस्थित कंपनीला या महिन्याच्या सुरुवातीला नाव बदलण्यासाठी आरओसीकडून मंजुरी मिळाली होती. वास्तविक स्विगी आपला IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.  एका अहवालानुसार स्वीगीच्या आयपीओ 100 कोटी डॉलर्सपर्यंत असू शकतो. स्विगीचा प्रतिस्पर्धी झोमॅटोने 2021 साली शेअर बाजारात प्रवेश केला. तेव्हापासून स्विगीने आयपीओ लॉन्च करण्याची योजना आखली आहे. 

आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत (Swiggy IPO)

स्विगीने नोंदणीकृत नाव बदलण्याचे एक कारण म्हणजे आयपीओ लॉन्च करणे. नाव बदलल्याने स्विगीला कॉर्पोरेट नाव ओळखण्यास मदत होईल. स्विगी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस आयपीओसाठी ड्राफ्ट दाखल करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे मुख्य उद्दिष्ट त्याच्या खर्चात कपात करून चांगला नफा मिळवणे आहे. स्विगी भविष्यात आपला नफा वाढवण्यासाठी आणखी काही पावले उचलू शकते.

मार्च 2023 ला संपलेल्या आर्थिक वर्षात स्विगीचा ऑपरेटिंग महसूल वार्षिक 45 टक्क्यांनी वाढून 8,265 कोटी रुपये झाला आहे. असं असलं तरी या कालावधीत कंपनीचा निव्वळ तोटा 15 टक्क्यांनी वाढून 4,179 कोटी रुपये झाला आहे. फूड डिलिव्हरी व्यतिरिक्त कंपनी स्विगी इंस्टामार्ट ब्रँड अंतर्गत किराणा सामान वितरीत करते.

नंदन रेड्डी आणि श्रीहर्ष मॅजेती यांनी 2014 मध्ये  Bundl Technologies Pvt Ltd ची स्थापना केली. सध्या श्रीहर्ष मॅजेती हे फर्मचे सीईओ आहेत.  

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
Chornobyl Nuclear Power Plant : चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
Why are airplane routes curved : दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 14 Feb 2025 : ABP Majha : 08 PMRanveer Allahbadia : रणवीर अलाहबादिया नॉट रिचेबल; घराला कुलूपMaharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 14 Feb 2025 :  ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 14 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
Chornobyl Nuclear Power Plant : चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
Why are airplane routes curved : दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
Chhaava Movie:
छावा चित्रपटातील 'त्या' एका डायलॉगने अख्खं चित्रपटगृह सुन्नं, आपला राजा काय होता एका वाक्यात कळलं!
मोठी बातमी! न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर RBI ची कारवाई, संचालक मंडळ बरखास्त 
मोठी बातमी! न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर RBI ची कारवाई, संचालक मंडळ बरखास्त 
EPFO News : ईपीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज लवकरच, ईपीएफओ व्याज दर जाहीर करणार, 12 टक्के व्याज कधी मिळालेलं?
ईपीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज लवकरच, ईपीएफओ व्याज दर जाहीर करणार, 12 टक्के व्याज कधी मिळालेलं?
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.