एक्स्प्लोर

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्ष पूर्ण होण्याअगोदर पैसे काढता येतात का?  जाणून घ्या कधी पैसे काढता येतात? प्रक्रिया काय असते? 

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी पैसे काढता येऊ शकतात. यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या माहिती असणं आवश्यक आहे. 

Sukanya Samriddhi Yojana नवी दिल्ली :  तुम्ही जर तुमच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करत असाल तर तुमच्या मनात एक प्रश्न नक्की येऊ शकतो.  तो म्हणजे 21 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी यामध्ये जमा झालेली रक्कम काढता येऊ शकते का? मात्र, यासाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. ही योजना दीर्घकालीन बचतीसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेत लवचिकता आहे, शिक्षण आणि लग्न यासारख्या मोठ्या खर्चांसाठी पैसे काढता येऊ शकतात. या संदर्भातील नियमांची माहिती करुन घेत, योग्य नियोजन करत तुम्ही गुंतवणूक केल्यास अडचणीत येणार नाहीत. 

सुकन्या समृद्धी योजनेतील पैसे कधीही काढता येतील असं नाही. या योजनेतून जमा केलेल्या काही रक्कमेपैकी रक्कम काढता येऊ शकते.  जेव्हा मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण होईल किंवा ती दहावी उत्तीर्ण होईल तेव्हा खात्यात जमा असलेल्या रकमेपैकी 50 टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकता. ही रक्कम गेल्या वर्षाच्या शेवटी जमा असलेल्या शिल्लक रकमेवर निश्चित केली जाते. याचं कारण सुकन्या समृद्धी योजनेचा पैसा मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासारख्या मोठ्या खर्चांवर खर्च व्हावा अशी सरकारची अपेक्षा असते. 

सुकन्या  समृद्धी योजनेतून पैसे काढण्याचे काही नियम आहेत. तुमची मुलगी 18 वर्षं पूर्ण झालेली असावी किंवा 10 उत्तीर्ण केलेलं असावं. तेव्हा तुम्ही पैसे काढू शकता. या दरम्यान तुमच्या खात्यात शिल्लक असलेल्या एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम काढता येते. मात्र, ही रक्कम वर्षातून एखदाच काढता येते, ही सुविधा पाच वर्षांपर्यंत मिळते.सुकन्या समृद्धी योजनेतून ज्या कारणासाठी पैसे काढले जातात त्याचा खर्च त्याच कारणासाठी करावा लागतो.

सुकन्या समृद्धी योजनेतून पैसे कसे काढायचे?

सर्वप्रथम सुकन्या समृद्धी योजनेतून पैसे काढण्यासाठी तुमच्या मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण असावं किंवा तिने दहावी उत्तीर्ण केलेली असावी.  गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस खात्यात जितकी शिल्लक असेल त्याच्या 50 टक्के रक्कम मिळेल. तुम्हाला है पैसे  शिक्षणासाठी लागणार असल्याचं कारण दिल्यास योग्य कागदपत्रं द्यावी लागतील. सुकन्या समृद्धी योजनेचं खातं जिथ म्हणजे बँक खात्यात किंवा पोस्टात असेल तर तिथं जाऊन अर्ज भरुन द्यावा लागेल. पैसे तुम्ही एका टप्प्यात किंवा विविध टप्प्यात घेऊ शकता.  सुकन्या समृद्धी योजनेतून वर्षातून एकवेळा पैसे काढता येतात. ही सुविधा पाच वर्ष लागू असेल. 

सुकन्या समृद्धी योजनेचं खातं 21 वर्षांअगोदर देखील बंद करता येतं. मुलीचं लग्न करण्यापूर्वी  एक महिने किंवा लग्नानंतर पैसे काढता येऊ शकतात. दुर्दैवी प्रसंगात मुलीचा मृत्यू झाल्यास ते खातं तातडीनं बंद केलं जातं. 

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Embed widget