एक्स्प्लोर

Success story:हा उद्योजक कमावतो वाया जाणाऱ्या फुलांमधून महिन्याकाठी 4 लाख रुपये, वापरली ही भन्नाट युक्ती

भारतात सणासुदीला फुलशेतीची चंगळ असते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण सण संपला की न विकली गेलेली फुलं शेवटी टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते.

Success story: भारत हा उत्सवांचा देश आहे. आणि उत्सव, सणवार म्हटलं की फुलांची सजावट आलीच. देशात देवाच्या आरतीसाठी हजारोंच्या संख्येनं फुलं वाहिली जातात. आपल्या प्रत्येक समारंभात या फुलांच केवढं महत्त्वय! पण भारत फुलशेतीत अग्रेसर जरी असला तरी खराब झालेली, सुकलेली फुलं शेवटी टाकूनच द्यावी लागतात. मग असे किती पैसे मिळणार फुलशेतीतून? पण, हाच समज दूर करत एका उद्योजकानं खराब झालेल्या, सुकलेल्या फुलांपासून व्यवसाय करण्याचं ठरवलं. आणि सोलार ड्रायरचा वापर करत दरमहिन्याला हा उद्योजक बसल्याबसल्या ४ लाख रुपये कमवतो. 

सौरऊर्जेचा वापर करून शिवराज निषाद या तरुण उद्योजकानं फुलांची नासाडी होण्यापासून मार्ग काढला आहे. उत्तरप्रदेशातल्या या तरुणानं महिलांसह अनेकांना रोजगार  दिलाय. सौरऊर्जेवर चालणाऱ्या ड्रायरने वाया जाणारी, सुकलेली फुलं वाळवत त्यानं अनेक फार्मास्युटीकल कंपन्यांना विकली. तसेच चहाचा मसाला करणाऱ्या कंपन्या तसेच औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना विकत दर महा ४ लाखांची कमाई केली आहे. सामान्य नोकरदाराचे वर्षाचे पॅकेज हा उद्योजक महिनाभरात कमवतो.

नक्की काय केलं या उद्योजकानं?

भारतात सणासुदीला फुलशेतीची चंगळ असते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण सण संपला की न विकली गेलेली फुलं शेवटी टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. उत्तरप्रदेशातील शेतकरी फुलांचं उत्पादन विक्रीसाठी नेता येऊ शकत नाही हे लक्षात आलं की गंगेवर फेकून देतात. यामुळं नदीत होणारा कचरा या उद्योजकानं पाहिला. या फुलांना सुकवून याचा आयुर्वेदिक आणि हर्बल उद्योगात मोठी मागणी असल्याचं या तरुणाला कळलं. आणि सुरु झाला सोलार ड्रायरपासून फुलांना सुकवण्याचा हा व्यवसाय.

आपल्या प्रदेशातील फुलांचा असा केला फायदा

उत्तरप्रदेशात येणाऱ्या फुलांचा नक्की कशासाठी वापर होऊ शकतो हे या उद्योजकानं शोधून काढलं. जसे की, गोकर्णाच्या फुलांचा हर्बल चहासाठी होणारा वापर आणि त्याची मागणी लक्षात घेता ही फुले कशी वापरता येतील याचा विचार करत ही फुले वाळवण्याचा निर्णय घेतला. वृद्धत्वविरोधी, मधुमेहविरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुण आहेत, हा निषादचा पहिला महत्त्वपूर्ण शोध होता. त्याच्या उत्पादनाची श्रेणी विस्तृत करण्यासाठी, त्याने चहा, सिरप आणि संरक्षित करण्यासाठी वापरण्यासाठी हिबिस्कस आणि कॅमोमाइलसह इतर फुले सुकवण्यास सुरुवात केली.

सोलार ड्रायने फुलांची गुणवत्ता टिकून राहते..

कृषी जागरणला दिलेल्या मुलाखतीत या उद्योजकानं सांगितलं, सौर ड्रायर धूळ आत जाऊ देत नाही. त्यात सुकणारे उत्पादन हे फूड-ग्रेड आणि 100% शुद्ध आहे,” निषाद स्पष्ट करतात. 40 ते 45 अंश सेल्सिअस तापमान स्थिर ठेवून गुणवत्तेचा त्याग न करता फुलांचा मूळ रंग आणि सुगंध कायम ठेवण्याची खात्री ड्रायरने केली. 

शेकडो स्थानिक शेतकऱ्यांना रोजगार

सध्या निषादचा फुलांचा व्यवसाय ५०० ते १००० किलो फुलांची विक्री करतो. ज्यामुळे महिन्याकाठी या उद्योजकाला १ लाख ते ४ लाख रुपये मिळतात. या व्यवसायाने शेकडो शेतकऱ्यांना रोजगार देण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget