Success Story: परदेशातली नोकरी सोडून शेतीत ठेवंल पाऊल, आज मशरुम शेतीतून करतोय कोट्यावधींची उलाढाल
Success Story: एका युवकाने अभियांत्रिकीची परदेशातील नोकरी सोडून उत्कृष्ट शेती केली आहे. प्रभात कुमार असं या युवकाचं नाव असून त्याने मशरुमच्या शेतीतून कोट्यावधी रुपयांचा नफा मिळवला आहे.
Success Story : अलीकडच्या काळात अनेक तरुण नोकरीच्या मागे न लागता उत्कृष्ट शेती करताना दिसत आहेत. या शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांचं उत्पन्न शेतकरी घेत आहेत. आज आपण अशाच एका युवकाची यशोगाथा पाहणार आहोत. बिहारमधील गया येथील एका युवकाने अभियांत्रिकीची परदेशातील नोकरी सोडून उत्कृष्ट शेती केली आहे. प्रभात कुमार असं या युवकाचं नाव असून त्याने मशरुमच्या शेतीतून कोट्यावधी रुपयांचा नफा मिळवला आहे. जाणून घेऊयात त्याची यशोगाथा.
बिहारमधील गया जिल्ह्यातील टिकारीच्या बडगाव गावात राहणारा तरुण शेतकरी प्रभात कुमारने यशस्वी शेती केली आहे. तो पूर्वी इंजिनीअर होता. प्रभातने अभियांत्रिकीची नोकरी सोडून शेती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.
बिहार कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता आठवीपर्यंत खासगी शाळेत शिकला, त्यानंतर तो जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकला. त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पूर्ण केलं. त्यानंतर त्याने कृषी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रभात कुमारला परदेशात नोकरी मिळाली होती.
मशरुमच्या शेतीतून 2 कोटींची उलाढाल
सुरुवातीला प्रभात कुमारने मशरुमची शेती करण्याचा निर्णय घेतला. पूर्वी लोकांना मशरुमबद्दल माहिती नव्हती. गेल्या 10 वर्षांपासून त्याची मागणी वाढली आहे. यामध्ये राज्याने बरीच प्रगती केली आहे. शेतीत बदल झाला आहे. प्रभातने 2016-17 मध्ये मशरुमची लागवड केली. सध्या तो मशरुम शेतीतून वार्षिक उलाढाल 2 कोटी रुपये करत आहे.
25 हजारांहून अधिक शेतकरी सामील
बिहारमधील सुमारे 450 गावांतील 25 ते 28 हजार शेतकरी प्रभात कुमार यांच्या कृषी अभियांत्रिकीशी संबंधित आहेत. त्यांनी प्रथम त्यांना पारंपारिक पद्धतीतून बाहेर काढले आणि नवीन कृषी तंत्राची ओळख करून दिली. प्रभातने मशरूम उत्पादनासाठी प्रोसेसिंग प्लांट बांधला, ज्यामध्ये अनेक लोक काम करतात. येथे दररोज 10 हजार किलो मशरूमचे उत्पादन होते. प्रशिक्षणासाठी त्यांनी समर्थ नावाची संस्था काढली आणि लोकांशी जोडण्यास सुरुवात केली. अगदी लहान खोलीतही मशरूमचे उत्पादन घेता येते. यासाठी शेतीची गरज नाही. यामुळेच नैसर्गिक आपत्तीचा धोका नगण्य राहतो. ज्यांच्याकडे शेतजमीन नाही ते लहान खोलीतही मशरूमचे उत्पादन घेऊ शकतात.
मशरुम शेतीसाठी शेतकऱ्यांना अनुदान
बिहारमध्ये मशरूमच्या लागवडीला चालना देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना अनुदान देते. मशरुम किट वितरण योजने' अंतर्गत राज्यातील शेतकरी 90 टक्के अनुदानावर एकूण 55 रुपये किंमतीत मशरुम किट खरेदी करु शकतात. म्हणजे शेतकऱ्यांना मशरुमच्या किटवर केवळ 5 ते 6 रुपये खर्च करावे लागणार आहेत.