ड्रॅगन फ्रूटची लागवड करा, अनुदान मिळवा; 'या' राज्य सरकारची योजना
ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) हे खूप लोकप्रिय फळ आहे. या फळाला सध्या बाजारात मोठी मागणी आहे. दिवसें दिवस मागणीत वाढ होत आहे.
Subsidy on Dragon Fruit Farming: ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) हे खूप लोकप्रिय फळ आहे. या फळाला सध्या बाजारात मोठी मागणी आहे. दिवसें दिवस मागणीत वाढ होत आहे. हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या फळाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होत आहे. या फळाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बिहार सरकार अनुदानह देत आहे.
बिहार सरकार राज्यात ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीवर भर देत आहे. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदानही दिले जात आहे. फलोत्पादन संचालनालय, कृषी विभाग, बिहार सरकारच्या मते, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान दिले जात आहे. यानुसार, ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी शेतकऱ्याला 1.25 लाख रुपये प्रति युनिट खर्चाच्या 40 टक्के म्हणजेच 50,000 रुपये मिळतील. ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे पाठवली जाईल.
ड्रॅगन फळांच्या लागवडीला प्रोत्साहन
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूट लागवड, शेत तयार करणे, सिंचन, तण नियंत्रण, कीटकनाशक नियंत्रण, काढणी व इतर खर्चासाठी अनुदान दिले जाते. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि राज्यात ड्रॅगन फ्रूट लागवडीला चालना देणे हा आहे. ड्रॅगन फ्रूट झाडे लागवडीनंतर सुमारे 18 महिन्यांनी फळ देण्यास सुरुवात करतात. फळे पिकल्यावर लाल किंवा गुलाबी होतात. फळ कापून ताजे खाऊ शकता.
ड्रॅगन फळ म्हणजे काय?
ड्रॅगन फ्रूट हे स्वादिष्ट आणि पौष्टिक फळ आहे. ज्यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक आढळतात. ड्रॅगन फ्रूटचा वापर फळे, ज्यूस आणि मिठाईमध्ये केला जातो.