एक्स्प्लोर

Share Market : शेअर बाजारात आज अस्थिरता, सार्वजनिक बँका आणि तेल कंपन्यांच्या इंडेक्समध्ये वाढ 

Stock Market Updates Today: आज आयटी इंडेक्समध्ये 0.5 टक्क्यांची घसरण झाली तर सार्वजनिक बँका आणि ऑईल अॅन्ड गॅसच्या इंडेक्समध्ये एका टक्यांची वाढ झाली आहे. 

मुंबई: आज दिवसभरात शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली. बाजार बंद होतान मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 51 अंकांची घसरण झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये एका अंकाची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 0.008 टक्क्यांची वाढ होऊन तो 62,130 अंकांवर पोहोचला. तर निफ्टी 18,497 अंकांवर स्थिरावला. 

आज शेअर बाजार बंद होताना एकूण 1787 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1688 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण 194 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज बाजार बंद होताना Asian Paints, Infosys, Eicher Motors, Titan Company आणि Kotak Mahindra Bank च्या निफ्टीमध्ये घसरण झाली. तर BPCL, Divis Laboratories, Coal India, Apollo Hospitals आणि UPL कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. 

आज शेअर बाजार बंद होताना आयटी इंडेक्समध्ये 0.5 टक्क्यांची घसरण झाली. तर सार्वजनिक बँका आणि ऑईल अॅन्ड गॅसच्या इंडेक्समध्ये एका टक्यांची वाढ झाली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये काहीशी वाढ झाली. 

रुपयाच्या किमतीत घसरण 

डॉलरच्या तुलनेत आज रुपयाच्या किमतीत 27 पैशांची घसरण झाली आहे. शुक्रवारी रुपयाची किंमत ही 82.27 इतकी होती, आज ती 82.54 इतकी आहे. 

Yes Bank शेअर्समध्ये वाढ 

Yes Bank शेअर्सने गेल्या 52 आठवड्यातील उच्चांक गाठला आहे. गेल्या आठवड्यातील शुक्रवारीही या शेअर्समध्ये तेजी होती. गेल्या दोन सत्रामध्ये या शेअर्सच्या किमतीत 20 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. 

IT Shares: आयटी कंपन्यांची खराब कामगिरी 

भारतीय आयटी कंपन्यांची कामगिरी गेल्या एका दशकातील सर्वात खराब अवस्थेकडे सुरू असल्याचं दिसून येत आहे. 2023 मध्ये मंदीची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने यामध्ये गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदार घाबरत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. 

Gold Silver Price Today: सोन्याचे भाव स्थिर तर चांदीच्या भावात तेजी 

आज सोन्याच्या किमतीत काही बदल झालेला नसला तरी चांदीच्या किमतीत मात्र तेजी असल्याचं दिसून आलं आहे. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 53,800 इतका आहे. तर 1 किलो चांदीच्या किमतीने 66,700 चा टप्पा पार केला आहे. 

आज या शेअर्समध्ये वाढ झाली 

  • BPCL- 3.12 टक्के
  • Divis Labs- 1.98 टक्के
  • Coal India- 1.55 टक्के
  • UPL- 1.22 टक्के
  • Apollo Hospital- 1.22 टक्के

आज या शेअर्समध्ये घसरण झाली 

  • Asian Paints- 1.88 टक्के
  • Infosys- 1.41 टक्के
  • Kotak Mahindra- 1.18 टक्के
  • Titan Company- 1.18 टक्के
  • Eicher Motors- 1.12 टक्के
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal Doctor : पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येण
पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येणार
Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू
धुळ्यात चौकोनी कुटुंबाची आत्महत्या, पोलिसांना सुसाईड नोट सापडली, नातेवाईक म्हणतात घातपात झालाय
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Laxman Hake : मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhansabha Breaking : पेच असलेल्या जागांबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची मातोश्रीवर चर्चाSanjay Raut On Tisari Aghadi : विरोधकांची मत कमी करण्यासाठी तिसरी आघाडीShivaji Kardile Rahuri Vidhan Sabha : राहुरी मतदारसंघातूनच विधानसभा लढवणार : शिवाजी कर्डीलेRatnagiri Khed Crime News : रहस्यमय गुन्ह्यात सिंधुदुर्गमधून दोन तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal Doctor : पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येण
पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येणार
Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू
धुळ्यात चौकोनी कुटुंबाची आत्महत्या, पोलिसांना सुसाईड नोट सापडली, नातेवाईक म्हणतात घातपात झालाय
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Laxman Hake : मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Share Market Record : मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
Embed widget