Share Market Prediction: शेअर बाजारात 'या' शेअर्समध्ये आज दिसू शकते तेजी, होईल चांगला नफा!
Share Market Prediction: मागील दोन दिवसांपासून बाजारात घसरण असली तरी काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.
Share Market Prediction: शेअर बाजारात (Share Market) मागील दोन दिवसांपासून विक्रीचा सपाटा सुरू असून बाजारात घसरण दिसून येते आहे. शेअर बाजारातील सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांकात एक टक्क्यांपर्यंतची घसरण दिसून आली. आशियाई शेअर बाजारातील (Asian Share Market) घसरण आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि एचडीएफसी (HDFC) आदी कंपन्यांच्या शेअर दरात विक्रीचा सपाटा दिसून आला.
बुधवारी, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 635.05 अंकांच्या घसरणीसह 61,067.24 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 186.20 अंकांच्या घसरणीसह 18,199.10 अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्स निर्देशांकात इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, मारुती, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, अॅक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर दरात घसरण दिसून आली. तर, सन फार्मा, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टेक महिंद्रा, नेस्ले, विप्रो आणि इन्फोसिस या कंपन्यांचे शेअर्स वधारले.
या शेअर्समध्ये आज तेजीचे संकेत
MACD नुसार, Morepen Labs, Cipla, Aurobindo Pharma आणि Thyrocare या कंपन्यांच्या शेअर दरात तेजीचे संकेत दिसून येत आहे. त्याशिवाय, Abbott India, Esab India, GE Shipping आणि Axis Bank या कंपन्यांच्या शेअर दरात खरेदीचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे या शेअर्सवरही आज गुंतवणूकदारांची नजर राहणार आहे.
या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव
MACD इंडिकेटरनुसार JaiPrakash Power, Bank of Maharashra, IDFC First Bank आणि IFCI या कंपन्यांच्या शेअर दरात विक्रीचा जोर दिसून येत आहे. त्याशिवाय, Nykaa, Keystone Realtors, Piramal Pharma आणि Polyplex या कंपन्यांच्या शेअर दरात घसरणीचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे आज दिवसभरात शेअर बाजाराच्या कामकाजात या शेअर्सचे दर घसरण्याची शक्यता आहे.
MACD इंडिकेटर काय आहे?
MACD हे ट्रेंड रिव्हर्सलसाठी ओळखले जाते. MACD इंडिकेटरमध्ये सिग्नल लाइन ओलांडली की त्या शेअरमध्ये तेजी राहण्याचे संकेत समजले जातात. या MACD नुसार स्टॉकमधील संभाव्य तेजी आणि घसरण याचाही अंदाज लावता येतो.
(Disclaimer: ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.)