Stock Market Opening: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; निफ्टी 18,000 च्या जवळ, तर सेन्सेक्स 60,100 पार
Stock Market Opening : शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात. निफ्टी 18,000 च्या जवळ, तर सेन्सेक्स 60,100 पार.
Stock Market Opening: अमेरिकन बाजाराच्या (US Markets) मागील शानदार क्लोजिंगनंतर आज आशियाई बाजारात (Asian Markets) तेजी पाहायला मिळत आहे. या आधारावर असं म्हणता येईल की, आठवड्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात भारतीय शेअर बाजारासाठी चांगली ठरणार आहे. आज शेअर बाजार सुरुवातीच्या सत्रात तेजीत असल्याचं पाहायला मिळालं.
सुरुवातीची परिस्थिती काय?
आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात तेजीत झाल्याचं पाहायला मिळालं. बीएसईचा 30 शेअर्सचा इंडेक्स सेन्सेक्स 246.70 अंकांच्या म्हणजेच, 0.41 टक्क्यांच्या वाढीसह 60,147.07 वर उघडला. दुसरीकडे, NSE चा 50 शेअर्सचा इंडेक्स निफ्टी आज 93.10 अंकांच्या म्हणजेच, 0.52 टक्क्यांच्या वाढीसह 17,952.55 वर उघडला.
सेन्सेक्स अन् निफ्टीची स्थिती
आज शेअर मार्केटमध्ये, सेन्सेक्सच्या 30 पैकी 28 शेअर्समध्ये वाढ होत आहे आणि त्यातील 2 शेअर्स घसरल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, निफ्टीच्या 50 पैकी 47 शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे आणि 3 शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली आहे. बँक निफ्टीबद्दल बोलायचं झालं तर त्याची पातळी 42400 च्या पार गेली आहे आणि तो 214 अंकांच्या किंवा 0.51 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.
कोणत्या शेअर्समध्ये तेजी?
आज निफ्टीचे सर्व सेक्टोरियल इंडेक्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि केवळ कंज्यूमर ड्यूरेबल्स सेक्टरची स्थिती काहीशी बिघडलेली आहे. आज, टीसीएसच्या निकालापूर्वी, आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आयटी सेक्टरमध्ये दोन ते चतुर्थांश टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.
सेन्सेक्सचे 'हे' शेअर्स वधारले
आज सेन्सेक्सच्या वाढत्या शेअर्समध्ये टेक महिंद्रा, टीसीएस, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, भारती एअरटेल, विप्रो, एमअँडएम, टाटा स्टील, इंडसइंड बँक, इन्फोसिस, सन फार्मा, एलअँडटी, पॉवरग्रीड, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय, एनटीपीसी, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक, नेस्ले, एचयूएल, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स, मारुती आणि बजाज फिनसर्व्ह यांच्या शेअर्समध्ये जोरदार उसळी पाहायला मिळत आहे.
प्री-ओपनिंगमध्ये बाजाराची स्थिती काय?
आज शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंगमध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. BSE चा सेन्सेक्स 342.88 अंकांच्या म्हणजेच, 0.57 टक्क्यांच्या वाढीसह 60243.25 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. याशिवाय, NSE चा निफ्टी 104.45 अंकांच्या म्हणजेच, 0.58 टक्क्यांच्या वाढीसह 17963.90 च्या पातळीवर व्यवहार करत होता.