Stock Market Updates : नव्या वर्षात शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला
Stock Market : नवीन वर्षाच्या व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली.
Stock Market : नव्या वर्षातल्या व्यवहाराचे पहिल्या दिवसाचे शेअर बाजाराने जोरदार स्वागत केले. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, कच्च्या तेलाच्या दरात वाढ आणि परदेशी बाजारातून कोणतेही सकारात्मक संकेत नसताना सेनसेक्स आणि निफ्टी चांगलाच वधारला. सेन्सेक्स जवळपास 850 अंकांनी वधारला. दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 940 अंकांनी वधारत 59,191 अंकावर ट्रेड करत होता. तर, निफ्टी 17,624 अंकावर ट्रे़ड करत होता. निफ्टी हा 270 अंकांनी वधारला होता.
ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, न्यूझीलंड आणि थायलंडमध्ये सुट्टीमुळे शेअर बाजार बंद राहिला. काही राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध लागू केले आहेत. मात्र, या निर्बंधामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही. काही विशेष क्षेत्रातील कंपन्यांना वगळले तर इतर कंपन्यांच्या व्यवसायावर किंचीत परिणाम झाला आहे.
कोणते शेअर वधारले?
बजाज फिनसर्वच्या शेअर आज चांगलाच वधारला. Bajaj Finserv चा शेअर 3.32 टक्क्यांनी वधारला होता. त्याशिवाय अॅक्सिक बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक हे स्टॉकदेखील वधारले आहेत. ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारूती सुझुकीचाही शेअरही वधारला.
त्याशिवाय, विप्रो, लार्सन अॅण्ड ट्रुबो, एशियन पेंट्स आणि टेक महिंद्राच्या शेअर दरात वाढ झाली. एनटीपीसी, टीसीएस, पॉवर ग्रीड, एचसीएल टेक, इन्फोसिसच्या शेअरमध्ये एक टक्क्यांनी वाढ झाली. तर, पीव्हीआर आणि आयनॉक्सच्या शेअर दरात मोठी घट झाली. बॅक निफ्टीमध्ये चांगली तेजी दिसून आली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- तुम्ही बनावट पॅन कार्डचा वापर तर करत नाही ना? असे ओळखा खोटं पॅन कार्ड
- नव्या वर्षाची सुरुवात करताना गुंतवणुकीचा आढवा, काय पूर्वतयारी कराल!
- Bank Holidays : जानेवारी 2022 मध्ये 16 दिवस बँकांना सुट्टी; पाहा संपूर्ण यादी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha