(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शेअर बाजारात तेजी, बीएसई सेन्सेक्सने पार केला 71600 चा आकडा
काल PSU बँकांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली होती. परंतू, आज बँक समभाग सावरले आहेत. बँक निफ्टीच्या वाढीला समर्थन देत आहेत.
Stock Market Opening: काल PSU बँकांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली होती. परंतू, आज बँक समभाग सावरले आहेत. बँक निफ्टीच्या वाढीला समर्थन देत आहेत. आयटी समभागांमध्येही रिकव्हरीचा कल आहे. तर बीएसई सेन्सेक्सने (BSE Sensex) 71600 चा आकडा पार केला आहे. शेअर बाजाराची आज शांततापूर्ण सुरुवात झाली आणि सेन्सेक्सची सुरुवात किंचित घसरणीने झाली आहे. तर मेटल, रियल्टी आणि फायनान्शिअल सर्व्हिसेस क्षेत्रात घसरण होत आहे.
शेअर बाजाराची सुरुवात कशी झाली?
बीएसई सेन्सेक्स 18.14 अंकांनी घसरून शेअर बाजार 71,410 वर उघडला आहे. तर NSE चा निफ्टी 9 अंकांच्या वाढीसह 21,727 च्या पातळीवर उघडला.
फ्लॅट ओपनिंगनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये सुधारणा
शुक्रवारी देशांतर्गत बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात वाढ झाली. बीएसईचा 30 समभाग असलेला सेन्सेक्स 122.61 अंकांनी वाढून 71,551.04 अंकांवर पोहोचला. निफ्टी 45.45 अंकांनी वाढून 21,763.40 अंकांवर पोहोचला. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) काल 4933.78 कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत.
'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये झाली वाढ
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो, स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढल झाली आहे. भारती एअरटेल, मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्सचे नुकसान झाले.
जागतिक बाजारातून आज सकारात्मक संकेत
जर आपण निफ्टी शेअर्सवर नजर टाकली तर NSE च्या 2446 शेअर्सच्या ट्रेडमध्ये 546 शेअर्समध्ये वाढ दिसून आली आहे. तर 1781 शेअर्समध्ये घट झाली आहे. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 23 शेअर्समध्ये वाढ तर 26 शेअर्समध्ये घट दिसून येत आहे. याशिवाय एक शेअर कोणताही बदल न करता व्यवहार करत आहे. गुरुवारी अमेरिकन बाजार सकारात्मक पातळीवर बंद झाले. आज सकाळी इतर आशियाई बाजारात जपानचा निक्की आणि चीनचा शांघाय कंपोझिट नफ्यात दिसला आहे. हाँगकाँगचा हँग सेंग तोट्यात होता.
काल कशी होती स्थिती?
काल देशांतर्गत शेअर बाजारात सुरुवातीलाच वाढ दिसून आली. सेन्सेक्सने 300 अंकांनी झेप घेत 72500 च्या जवळ गेला होता. तर बँक निफ्टीमध्येही वाढ दिसून आली होती. निफ्टी 22 हजारांच्या वर गेली होती. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाच्या दिवशी शेअर बाजारातून जबरदस्त सकारात्मक संकेत मिळत आहेत. निफ्टी 22000 च्या वर जात आहे आणि प्री-ओपनिंगपासून बाजारात जोरदार तेजी आहे. काल अमेरिकन बाजार विक्रमी पातळीवर बंद झाले होते. आशियाई बाजारही सकारात्मक संकेतांवर आहेत. त्यामुळं बाजारातील गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
महत्वाच्या बातम्या: