एकेकाळी बिल गेट्सचा सहाय्यक, आज जगातील पाचव्या क्रमाकांचा श्रीमंत व्यक्ती
एकेकाळी बिल गेट्सचा सहाय्यक असणाऱ्या व्यक्तीनं अद्भुत कामगिरी केली आहे. हा व्यक्ती जगातील पाचव्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती झाला आहे.
Worlds 5th Richest: जगातील पाच सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामील होणे ही काही सोपी गोष्ट नाही. एकेकाळी बिल गेट्सचा सहाय्यक असणाऱ्या व्यक्तीनं अद्भुत कामगिरी केली आहे. हा व्यक्ती जगातील पाचव्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती झाला आहे. स्टीव्ह बाल्मर असे जगातील पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये एलोन मस्क असो वा बिल गेट्स असो प्रत्येकाने व्यवसायात यश मिळवले आहे. तेव्हाच ते जगातील अव्वल श्रीमंतांमध्ये सामील होऊ शकले. आता या यादीत नव्या नावाची भर पडली आहे. गमतीची गोष्ट म्हणजे जगातील पाच सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेल्या या व्यक्तीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात खूप काळ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या बिल गेट्सचा सहाय्यक म्हणून केली होती. स्टीव्ह बाल्मर असे त्यांचे नाव आहे.
स्टीव्ह बाल्मर यांची एकूण संपत्ती किती?
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार सध्या जगातील पाचव्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती म्हणजे स्टीव्ह बाल्मर. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, स्टीव्ह बाल्मरची सध्याची एकूण संपत्ती 120 अब्ज डॉलर आहे. बाल्मरची एकूण संपत्ती 24 तासांत 2.60 अब्ज डॉलरने वाढली आहे. आता फक्त एलोन मस्क, जेफ बेझोस, बर्नार्ड अर्नॉल्ट आणि बिल गेट्स त्यांच्या पुढे आहेत.
टॉप-5 मध्ये या लोकांची नावे
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क आहेत. ज्यांची एकूण संपत्ती 198 अब्ज डॉलर आहे. दुसर्या स्थानावर जेफ बेझोस आहेत. त्यांची एकूण संपत्ती 160 अब्ज डॉलर आहे. फ्रान्सचे बर्नार्ड अर्नॉल्ट 157 अब्ज डॉलरसह तिसऱ्या स्थानावर आहेत. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांची सध्याची एकूण संपत्ती 124 अब्ज डॉलर आहे. तर स्टीव्ह बाल्मर हे श्रीमंतांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत.
या दिग्गजांच्या पुढे गेले स्टीव्ह बाल्मर
स्टीव्ह बाल्मरबद्दल बोलायचे तर त्याच्यात आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या बिल गेट्समध्ये फारसा फरक नाही. बिल गेट्सची सध्याची एकूण संपत्ती स्टीव्ह बाल्मरपेक्षा फक्त 4 अब्ज डॉलरने अधिक आहे. सध्या बाल्मर अनेक दिग्गजांना मागे टाकत पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत. एकूण संपत्तीच्या बाबतीत, त्याने आता लॅरी एलिसन (119 अब्ज डॉलर), वॉरेन बफे (115 अब्ज डॉलर), लॅरी पेज (114 अब्ज डॉलर), मार्क झुकेरबर्ग (113 अब्ज डॉलर) आणि सर्गे ब्रिन (108 डॉलर अब्ज) यांना मागे टाकले आहे.
टॉप-10 मध्ये केवळ एकच गैर-संस्थापक
टॉप-10 श्रीमंत लोकांच्या यादीत स्टीव्ह बाल्मर हा एकमेव व्यक्ती आहे. जो कोणत्याही कंपनीचा संस्थापक किंवा सह-संस्थापक नाही. जरी तो निश्चितपणे मायक्रोसॉफ्टच्या सर्वात जुन्या कर्मचार्यांपैकी एक आहे. बिल गेट्स यांच्यानंतर त्यांनी 2000 मध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला. ते 1980 मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाले आणि कंपनीचे 30 वे कर्मचारी बनले. मायक्रोसॉफ्टच्या अनेक महत्त्वाच्या यशांचे श्रेय त्यांना जाते.
यावर्षी संपत्तीत झाली खूप मोठी वाढ
स्टीव्ह बाल्मर हे जवळपास 14 वर्षे मायक्रोसॉफ्टचे सीईओ होते. सत्या नडेला यांनी त्यांचे पद सोडल्यानंतर 2014 मध्ये मायक्रोसॉफ्टच्या सीईओची जबाबदारी देण्यात आली होती. स्टीव्ह बाल्मरच्या संपत्तीत मायक्रोसॉफ्टचा अजूनही मोठा वाटा आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये त्यांची सुमारे चार टक्के भागीदारी आहे. कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळं स्टीव्ह बाल्मरच्या एकूण संपत्तीमध्ये यावर्षी सुमारे 30 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: