एक्स्प्लोर

Solar Production : 2000 कोटींची गुंतवणूक, 1200 नोकऱ्यांची निर्मिती, 'या' कंपनीचा पुढाकार, सौर उत्पादन वाढणार

जॅकसन इंजिनिअर्स ही कंपनी सौर उत्पादन (Solar Production) व्यवसायाचा मोठा विस्तार करणार आहे. कंपनी सुमारे 2000 कोटी रुपये गुंतवून 2500 मेगावॅट क्षमतेच्या सौर सेल उत्पादन सुविधा उभारणार आहे.

Solar Production: जॅकसन इंजिनिअर्स लिमिटेड (Jackson Engineers LTD) जी ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील जॅकसन ग्रुपचा एक भाग आहे. ही कंपनी सौर उत्पादन (Solar Production) व्यवसायाचा मोठा विस्तार करणार आहे. कंपनी सुमारे 2000 कोटी रुपये गुंतवून 2500 मेगावॅट क्षमतेच्या सौर सेल उत्पादन सुविधा उभारणार आहे. जी दोन टप्प्यांमध्ये विकसित केली जाणार आहे. त्याचबरोबर कंपनी सध्या अस्तित्वात असलेल्या सौर मॉड्यूल उत्पादन क्षमतेला 2000 मेगावॅटपर्यंत वाढवणार आहे. या माध्यमातून 1200 नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे. 

दरम्यान कंपनीचा हा विस्तार जॅकसन इंजिनिअर्स लिमिटेडसाठी एक महत्वाचा टप्पा आहे. जो सौर ऊर्जा उपायांसाठी वाढत्या मागणीची पूर्तता करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतो. उत्पादन क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ करुन, जॅकसन आपल्या ग्राहकांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. जागतिक पातळीवर नवीकरणीय ऊर्जेच्या दिशेने होणाऱ्या बदलाला मोठे योगदान देणार आहे.

 कंपनी सातत्याने नवीन उंची गाठत आहे

जॅकसन ग्रुपचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुनील गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्पादन क्षमतेतील या मोठ्या वाढीची घोषणा करताना आम्ही अत्यंत आनंदित आहोत. हा विस्तार बाजारात आमची स्थिती मजबूत करतो आणि जॅकसनच्या सौर उत्पादन क्षेत्रातील उल्लेखनीय प्रगतीला अधोरेखित करतो. आमची कंपनी सातत्याने नवीन उंची गाठत आहे. ही वाटचाल भविष्यातही आम्हाला पूर्णपणे एकत्रित सौर उपाय प्रदाता बनण्याचा आमचा मानस मजबूत करत असल्याचे सुनील गुप्ता म्हणाले. 

1200 नवीन नोकऱ्या निर्माण होणार 

जॅकसनची दर्जेदार उत्पादने आणि सेवांबाबतची वचनबद्धता कायम राहिली आहे. नवीन अत्याधुनिक TOPCON तंत्रज्ञानासह हा विस्तार कंपनीच्या शाश्वततेला आणि नावीन्यतेला प्रोत्साहन देतो. ज्यामुळं त्यांच्या उत्पादनांचा कार्यक्षमतेमध्ये आणि विश्वासार्हतेमध्ये उच्च दर्जा सुनिश्चित केला जातो. सौर सेल उत्पादन सुविधा पहिला टप्पा पुढील 15 महिन्यांत सुरु होणार आहे. तर मॉड्यूल प्लांटचा विस्तार सहा महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या विस्तार योजनेमुळे या भागात 1200 नवीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत. हा मोठा गुंतवणूक निर्णय भारतातील शाश्वत ऊर्जा विकासासाठी जॅकसन इंजिनिअर्स लिमिटेडच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे. भारताची सध्याची सौर सेल उत्पादन क्षमता फक्त 7 GW आहे. अशा परिस्थितीत जॅकसनचा हा विस्तार देशात होणाऱ्या आयाती वर अवलंबून न राहत  देशांतर्गत उत्पादनात वाढ करेल. “आत्मनिर्भर भारत” साध्य करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

शाश्वत ऊर्जेच्या निर्मितीला मोठी चालना

जॅकसन ग्रुप सतत प्रगती करत आहे,. हा विस्तार आमच्या दृष्टिकोनाचा आणि आमच्या उच्च गुणवत्तेच्या सौर उत्पादनांसाठी वाढत्या मागणीचा पुरावा आहे. आम्ही आमची मागणीची पूर्तता करण्याच्या क्षमतेला अधिक मजबूत करत आहोत आणि ग्राहकांना उत्तम मूल्य देण्यासाठी सज्ज असल्याचे सुनील गुप्ता  म्हणाले. आगामी काळात, जॅकसन इंजिनिअर्स लिमिटेड 5000 मेगावॅट क्षमतेचा एकत्रित सौर वेफर, सेल आणि मॉड्यूल निर्माता बनण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. जे भारताच्या नेट झिरो उत्सर्जन साध्य करण्याच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाशी सुसंगत आहे. शाश्वत ऊर्जेसाठी बांधिलकी असलेल्या जॅकसन इंजिनिअर्स लिमिटेडने शाश्वत ऊर्जेच्या दिशेने देशाच्या प्रवासाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

जॅकसन ग्रुपबद्दल माहिती

1947 मध्ये स्थापन झालेली जॅकसन ग्रुप ही डिझेल जनरेटर उत्पादनात विशेष कौशल्य असणारी कंपनी आहे. आता ती एक बहुआयामी ऊर्जा उपाय प्रदाता झाली आहे. कंपनीच्या कार्यक्षेत्रात विखुरलेली ऊर्जा, सौर ऊर्जा, पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोत, पर्यायी इंधन, उच्च-तंत्रज्ञान ऊर्जा साठवण प्रणाली आणि नागरी व पायाभूत सुविधा EPC सेवा यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी!  CV ठेवा तयार, भारतात 'या' क्षेत्रात येणार नोकऱ्यांचा पूर, जाणून घ्या सविस्तर माहिती 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Embed widget