एक्स्प्लोर

मुंबईत सोन्यासह हिऱ्यांची तस्करी, मुंबई कस्टमकडून 3 प्रवाशांना अटक, 3.12 कोटी रुपयांचा माल जप्त

मुंबईत सोने आणि हिऱ्यांची तस्करी (Gold and Diamonds Smuggling) होत असल्याचे समोर आले आहे. मुंबई कस्टमने 3 प्रवाशांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 3.12 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

Gold and Diamonds Smuggling Mumbai : मुंबईत सोने आणि हिऱ्यांची तस्करी (Gold and Diamonds Smuggling) होत असल्याचे समोर आले आहे. काल रात्री मुंबई कस्टमने (Mumbai Customs) दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण 2.286 किलो सोने आणि हिरे जप्त केले, ज्याची किंमत अंदाजे 1.58 कोटी रुपये (सोन्याचे मूल्य) आणि 1.54 कोटी रुपये हिऱ्यांची किंमत आहे. याप्रकरणी तीन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण 3.12 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. 

दुबईहून मुंबईत येणाऱ्या प्रवाशाकडे सापडले सोने

पहिल्या प्रकरणात, दुबईहून मुंबईत येणाऱ्या एका संशयीत प्रवाशाला थांबवण्यात आले आणि त्याच्याकडून तस्करीचा माल जप्त करण्यात आला. ज्यात 24 कॅरेट सोन्याचे 12 बार (एकूण वजन 1400 ग्रॅम), अंदाजे किंमत 97,00,236 रुपये आहे. हे सोने प्रवाशाने पॅन्टच्या बेल्टजवळ लपवले होते. चौकशीदरम्यान प्रवाशाने सांगितले की, हे कृत्य त्याच फ्लाइटमधून प्रवास करणाऱ्या दुसऱ्या प्रवाशाच्या सांगण्यावरून केले आहे. सहप्रवाशानेही आपल्या निवेदनात हे मान्य केले. दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

हाँगकाँगहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवशाकडे सोन्यासह हिरे

दुसऱ्या प्रकरणात, हाँगकाँगहून मुंबईकडे येणाऱ्या एका प्रवाशाला थांबवून त्याच्याकडून तस्करीचा माल जप्त करण्यात आला. ज्यामध्ये दोन 24 कॅरेट सोन्याच्या बांगड्या (एकूण वजन 886 ग्रॅम, किमतीचे 61,38,864 रुपये), रोलेक्स घड्याळ (13,70,520 रुपये किमतीचे) होते.  तर 1,54,18,575 रुपये किमतीचे हिरे जप्त करण्यात आले. सोने, रोलेक्स घड्याळ प्रवाशाने परिधान केले होते, तर हिरे प्रवाशाने परिधान केलेल्या बनियानच्या आत एका विशिष्ट ठिकाणी लपवून ठेवले होते. याप्रकरणी त्या प्रवाशाला अटकही करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाने दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास सुरू केला आहे.

गेल्या महिन्यातच मुंबई 23 किलो सोने जप्त केले होते

गेल्या महिन्यातच मुंबई सेंट्रल (Mumbai Central) येथे महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) केलेल्या कारवाईत तस्करीतील सोने (Smuggled gold) लपवण्यासाठी जाणाऱ्या तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून 23 किलो सोने (Gold) हस्तगत करण्यात आले होते. या योन्याची एकूण किंमत ही सुमारे 17 कोटी रुपये होती. गिरगाव फणसवाडी येथून मुंबई सेंट्रल येथे सोने घेऊन जात असताना आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणी आणखी एका आरोपीचा सहभाग उघड झाला होता. मुंबईत सातत्यानं अशा घटना घडताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

सोन्याची तस्करी! 17 कोटी रुपयांच्या 23 किलो सोन्यासह 3 आरोपी जेरबंद, महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange: वडीगोद्रीतील तणावाची परिस्थिती निवळली; जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस,जालन्यासह 'या' जिल्ह्यात बंदची हाक
वडीगोद्रीतील तणावाची परिस्थिती निवळली; जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस,जालन्यासह 'या' जिल्ह्यात बंदची हाक
खानापूर विधानसभा मतदारसंघातून 'वंचित'कडून संग्राम माने यांना उमेदवारी जाहीर
खानापूर विधानसभा मतदारसंघातून 'वंचित'कडून संग्राम माने यांना उमेदवारी जाहीर
मुंबईत सोन्यासह हिऱ्यांची तस्करी, मुंबई कस्टमकडून 3 प्रवाशांना अटक, 3.12 कोटी रुपयांचा माल जप्त
मुंबईत सोन्यासह हिऱ्यांची तस्करी, मुंबई कस्टमकडून 3 प्रवाशांना अटक, 3.12 कोटी रुपयांचा माल जप्त
Dushyant Chautala : 'त्यावेळी भाजपसोबत राहणं, माझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक होती...',हरियाणाच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
'ती माझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक होती...',हरियाणाच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas Aathwale on Dharavi : धारावीतीन मशि‍दीवरील करवाई थांबवण्यासाठी मी फोन केला...Lalbaugcha Raja Auction : बॅट, बाईक ते सोनं राजाच्या चरणी अर्पण झालेल्या वस्तूंचा लिलावAarya Jadhav Interview Bigg Boss: निक्कीच्या कानाखाली मारलेल्या आर्याची मुलाखतGhanshyam Darwade Bigg Boss : Chota Pudhari : बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची घरात गोची? Suraj Chavan

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange: वडीगोद्रीतील तणावाची परिस्थिती निवळली; जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस,जालन्यासह 'या' जिल्ह्यात बंदची हाक
वडीगोद्रीतील तणावाची परिस्थिती निवळली; जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस,जालन्यासह 'या' जिल्ह्यात बंदची हाक
खानापूर विधानसभा मतदारसंघातून 'वंचित'कडून संग्राम माने यांना उमेदवारी जाहीर
खानापूर विधानसभा मतदारसंघातून 'वंचित'कडून संग्राम माने यांना उमेदवारी जाहीर
मुंबईत सोन्यासह हिऱ्यांची तस्करी, मुंबई कस्टमकडून 3 प्रवाशांना अटक, 3.12 कोटी रुपयांचा माल जप्त
मुंबईत सोन्यासह हिऱ्यांची तस्करी, मुंबई कस्टमकडून 3 प्रवाशांना अटक, 3.12 कोटी रुपयांचा माल जप्त
Dushyant Chautala : 'त्यावेळी भाजपसोबत राहणं, माझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक होती...',हरियाणाच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
'ती माझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक होती...',हरियाणाच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार, बारामतीत झळकले बॅनर, राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण 
सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार, बारामतीत झळकले बॅनर, राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण 
Numerology : प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Vande Bharat Sleeper पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
Embed widget