Silver Price Today: ऐन थंडीत चांदीचं मार्केट तापलं! एकाच दिवसात तब्बल 12 हजारांची उसळी, चांदीचा आजचा भाव किती?
Silver Price Today: देशभरात चांदीची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव शहरात चांदीच्या बाजारपेठेत एकाच दिवसात चांदीच्या भावात तब्बल 12 हजार रुपये प्रति किलो वाढ झाली आहे.

Silver Price Today: देशभरात चांदीची (Silver) राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव शहरात चांदीच्या भावांनी (Silver Rate) इतिहासातील आणखी एक उच्चांक गाठला आहे. चांदीच्या बाजारपेठेत एका दिवसात तब्बल 12 हजार रुपये प्रती किलो इतकी प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे आजचा चांदीचा भाव थेट 1 लाख 94 हजार रुपये प्रति किलो इतका झाला आहे.
Silver Price Today: जानेवारीपासून आतापर्यंत 1.04 लाखांची वाढ
यावर्षी जानेवारी महिन्यात चांदीचा भाव तुलनेने स्थिर होता; मात्र त्यानंतरच्या काही महिन्यांमध्ये जागतिक आर्थिक चढ-उतार, औद्योगिक मागणी, इलेक्ट्रॉनिक आणि सोलार उद्योगातील वाढती गरज, तसेच गुंतवणूकदारांकडून वाढलेला कल यामुळे चांदीच्या किमतींनी अक्षरशः झेप घेतली आहे. जानेवारीपासून आजपर्यंत चांदीच्या किमतींमध्ये तब्बल 1 लाख 04 हजार रुपये प्रति किलो वाढ झाली. ही वाढ सुमारे 115 टक्के इतकी असल्याचे दिसून येत आहे.
Silver Price Today: चांदीच्या दरवाढीचे कारणे
चांदीच्या तेजीमागे अनेक घटक कार्यरत असून त्यात सणासुदीची वाढती मागणी, औद्योगिक वापरातील वाढ आणि पुरवठ्यातील मर्यादा यांचा मोठा वाटा आहे. भारत हा जगातील प्रमुख चांदी ग्राहक देश असल्याने सणासुदीच्या काळात चांदीच्या मागणीत वाढ होत असते. यासोबतच सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये चांदीचा वाढता वापर, एआय संबंधित हार्डवेअर आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगात लागणाऱ्या चांदीच्या मागणीत झालेली झपाट्याने वाढ या सर्व कारणांनी चांदीच्या दरांना मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Silver Price Today: चांदीचे भाव आणखी वाढणार?
गुंतवणुकीच्या दृष्टीने चांदी योग्य पर्याय ठरू शकते का, याबाबत एका वृत्तपत्राच्या अहवालात काही महत्त्वाचे संकेत दिले आहेत. चांदीच्या व्यापारावर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, सुमारे 1,85,500 रुपयांच्या स्तरावर खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. त्यांच्या अंदाजानुसार चांदीचा दर पुढील काळात 1.90 लाख ते 1.94 लाख रुपये प्रति किलो या श्रेणीत पोहोचू शकतो. तज्ज्ञ म्हणतात की, फिजिकल डिमांड आणि औद्योगिक धातूंतील बुलिश सेंटिमेंट यामुळे चांदीच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. दरम्यान, गुंतवणूकदारांचे लक्ष सध्या फेड रिझर्व्हच्या आगामी बैठकीकडे केंद्रित असून, 25 बेसिस पॉइंट्सच्या दरकपातीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम चांदी आणि सोन्याच्या बाजारावरही पडण्याची शक्यता आहे. चांदीच्या किमती विक्रमी उच्चांकावर आहेत, त्यामुळे आता खरेदी टाळली पाहिजे, असं बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर आगामी काळात चांदीचे भाव अजूनही वाढण्याची शक्यता चांदीचे व्यवसायिक वर्तवत आहेत.
आणखी वाचा
























