चांदी उसळली! खामगावच्या प्रसिद्ध सराफा बाजारात किलोमागे चांदीचा दर इतक्या लाखांवर...
Silver price:

Silver prices hike: देशभरात चांदीच्या दरात मोठी चमक पाहायला मिळत असून देशभरात प्रसिद्ध असलेल्या खामगावच्या चांदीच्या बाजारात आज चांदीने उच्चांकी दर गाठला आहे. आज चांदीचा भाव प्रतिकिलो 1,15,000 रुपये इतका झाला असून, मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या दरांमुळे चांदी गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा संभ्रमावस्था आहे.
खामगावचा चांदी बाजार महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात नावाजलेला असून, येथे दररोज मोठ्या प्रमाणावर चांदीची खरेदी-विक्री होते. सणासुदीच्या दिवसांपासूनच चांदीच्या दरात हळूहळू वाढ होत होती. मात्र, गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या घडामोडी, चलनवाढ, डॉलरची कमजोरी आणि गुंतवणूकदारांचा कल या सर्वांचा परिणाम म्हणून चांदीचे दर उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत.
दिल्लीपासून जगभरात चांदीचे दर वधारले!
देशाची राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी चांदीच्या दरात 5000 रुपयांची वाढ झाली. चांदी सध्या 1 लाख 15 हजार रुपये प्रति किलोदराने विकली जात आहे. शनिवारी, चांदीचा भाव 4500 रुपयांनी वाढून 1 लाख 10 हजार रुपये प्रति किलो (सर्व करांसह) या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. दरम्यान, बुलढाण्यात खामगाव बाजारात प्रतिकिलो चांदीचा दर १.१५ लाख रुपयांवर पोहोचला असून, काही व्यापाऱ्यांच्या मते पुढील काही दिवसांत हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी आणि अस्थिर आर्थिक व्यवहारांमुळे चांदीची किंमत वाढण्याची शक्यताय.
जळगावात सोन्याचांदीचा भाव किती?
दरम्यान, जळगाव येथील सोन्याच्या दरांमध्येही थोडी वाढ झाली आहे. आज दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,००० रुपये असून, जीएसटीसह हा दर १,०१,००० रुपये इतका आहे.मात्र, सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात झालेली झपाट्याने वाढ लक्षवेधी आहे. त्यामुळे लवकरच चांदी गुंतवणुकीचा ‘नवा पर्याय’ म्हणून समोर येईल, असा अंदाज बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला आहे
.
























