नावाला पेनी स्टॉक, पण ठरतोय शेअर बाजारातील किंग, 'या' कंपनीच्या शेअरने दिले 3400 टक्के रिटर्न्स!
शेअर बाजारात अनेक कंपन्या अशा आहेत, ज्या आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देत आहेत. सध्या आयटी क्षेत्रातील अशाच एका कंपनीची चर्चा होत आहे.
मुंबई : शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करून तुम्हाला पैसे कमवण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण सध्या शेअर बाजारात आयटी क्षेत्रातील एक कंपनी चांगला धुमाकूळ घालत आहे. या कंपनीने गेल्या काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न्स दिले आहेत. या कंपनीचे ना वल पॉइंट वन सोल्यूशन असून गेल्या चार वर्षांत या कंपनीच्या समभागांत साधारण 3400 टक्क्यांनी तेजी आली आहे. त्यामुळे या कंपनीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
वन पॉइंट वन सोल्यूशन सुस्साट
29 नोव्हेंबर 2019 रोजी राष्ट्रीय शेअर बाजारावर वन पॉइंट वन सोल्यूशन या कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त 1.58 रुपये होती. आज हा शेअर थेट 55 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. आज म्हणजेच शनिवारी शेअर बाजार चालू होता. आज स्पेशल ट्रेडिंग दरम्यान या शेरच्या किमतीत साधारण दोन टक्क्यांची वाढ झाली. आता एनएसईवर हा शेअर 58.65 रुपयांवर बंद झाला आहे. त्यामुळे आगामी काळातही हा शेअर चांगला परतावा देण्याची शक्यता आहे.
कंपनीच्या शेअरचा परफॉर्मन्स काय?
गेल्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्य 7 टक्क्यांची तेजी नोंदवली गेली. त्यामुळे हा शेअर 51.95 रुपयांवरून 55 रुपयांपर्यंत पोहोचला होता. गेल्या सहा महिन्यात या स्टॉकमध्ये 40 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. एका वर्षाची तुलना करायची झाल्यास या शेअरमध्ये साधारण 160 टक्क्यांनी तेजी पाहायला मिळाली. वन पॉइंट वन सोल्यूशन या कंपनीच्या शेअरचे 52 आठवड्यांतील सर्वोच्च मूल्य हे 70 रुपये आहे. दुसरीकडे याच कंपनीचे 52 आठवड्यातील सर्वांत कमी मूल्यक 20.35 रुपये आहे. या कंपनीचे एकूण मार्केट कॅपिटल 1,252.70 कोटी रुपये आहे.
कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ
या स्मॉल कॅप कंपनीने नुकतेच मार्च तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. या तिमाहित कंपनीने एकूण 6.6 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमवला. गेल्या वित्त वर्षात याच काळात कंपनीचा निव्वळ नफा 2.95 कोटी रुपये होतेा. म्हणजेच निव्वळ नफ्याच्या तुलनेत एका वर्षांत कंपनीने 105 टक्के प्रगती केलेली आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
सुप्त ज्वालामुखीच्या शेजारी सोन्याचा मोठा खजिना, एका झटक्यात होऊ शकतो पाकिस्तान श्रीमंत!