Share Market : शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला
Share Market Updates : शुक्रवारी सकाळी शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला आहे.

Share Market Updates : गुरुवारी नफा वसुलीमुळे घसरलेला शेअर बाजार आज सावरल्याचे चित्र आहे. शेअर बाजारातील व्यवहार सुरू होताच सेन्सेक्समध्ये तेजी दिसून आली. जागतिक शेअर बाजारातूनही भारतीय शेअर बाजाराला पूरक असे वातावरण असल्याचे दिसून आले.
निफ्टीमध्ये काय परिस्थिती?
निफ्टी 50 मधून 37 शेअर्सचे दर वधारले असून 13 शेअरमध्ये घसरण दिसून आली. सकाळी 9.30 वाजता निफ्टी 17,661 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
आज शेअर बाजारात कोल इंडियाच्या शेअर दरात 2.4 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. युपीएलमध्ये 1.7 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. टाटा कंसोर्शियम 1.38 टक्क्यांनी वधारला आहे. तर, हिंदाल्को 1.10 टक्क्यांहून अधिक वधारला आहे.
बीसएईचा निर्देशांक सेन्सेक्स 200 अंकानी वधारत 59,256 अंकावर सुरू झाला. तर, एनएसईचा निर्देशांक निफ्टी 50 अंकाहून अधिक अंकावर वधारत 17698 वर सुरू झाला.
गुरुवारी शेअर बाजारात काय होती स्थिती?
गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आले. शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 575 अंकांनी तर निफ्टीही 168 अंकानी घसरला. सेन्सेक्समध्ये 0.97 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,034 वर पोहोचला होता. तर, निफ्टीमध्ये 0.94 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,639 वर पोहोचला. गुरुवारी, 1678 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1644 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 102 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. बाजार बंद होताना फार्मा आणि रिअॅलिटी क्षेत्र सोडलं तर इतर सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही घसरण झाली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- IPO News : फ्लिपकार्टचा आयपीओ पुढच्या वर्षी बाजारात?, कंपनीने मूल्यांकनाचे लक्ष्य 700 कोटी पर्यंत वाढवले
- Ruchi Soya FPO List : रुची सोया इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये वाढ, FPO 31 टक्के प्रीमियमने 850 रुपये दराने सूचीबद्ध
- Adani Group : अदानी समुहाचं भागभांडवल 200 अब्ज डॉलर्सवर; अशी किमया करणारा भारतातील तिसरा उद्योग समूह
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
