Ruchi Soya FPO List : रुची सोया इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये वाढ, FPO 31 टक्के प्रीमियमने 850 रुपये दराने सूचीबद्ध
Ruchi Soya FPO List : कंपनीने 4,300 कोटी रुपयांच्या FPO मध्ये जारी केलेले 6.61 कोटी नवीन शेअर्स सूचीबद्ध केल्यामुळे कालच्या 818 रुपयांच्या बंद भावाच्या तुलनेत याचे शेअर्स 4 टक्क्यांनी वाढले.
Ruchi Soya FPO List : योगगुरु बाबा रामदेव यांच्या रुची सोया या खाद्यतेल कंपनीचं नाव सध्या बाजारात चांगलंच चर्चेत आहे. या कंपनीवर मालकी हक्क पतंजली आयुर्वेदचा आहे. रुची सोया कंपनीने कोरोना काळात गुंतवणुकदारांना मालामाल केलं. पतंजली आयुर्वेद प्रमोटेड रुची सोया इंडस्ट्रीजचे शेअर्स बीएसईवर 31 टक्के प्रीमियमने 850 रुपये दराने सूचीबद्ध झाले आहेत. (FPO) किमतीच्या तुलनेत शुक्रवारी मुंबईच्या फर्म मार्केटमध्ये 650 रुपयांच्या फॉलो-ऑन पब्लिक ऑफर देण्यात आली. कंपनीने 4,300 कोटी रुपयांच्या FPO मध्ये जारी केलेले 6.61 कोटी नवीन शेअर्स सूचीबद्ध केल्यामुळे कालच्या 818 रुपयांच्या बंद भावाच्या तुलनेत याचे शेअर्स 4 टक्क्यांनी वाढले. व्यापाऱ्यांच्या मते, बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली समुहाच्या रुची सोयाच्या बँकर्सना सेबीने 28 मार्च रोजी FPO मधील गुंतवणूकदारांना पैसे काढण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. यानंतर FPO साठी अर्ज केलेल्या असंख्य व्यक्तींनी (HNIs) त्यांचे शेअर्स टाकले आणि बोली लावली.
6,61,53,846 इक्विटी शेअर्सचे वाटप करण्यास मान्यता
सेबीच्या निर्देशानुसार, FPO 28 मार्चला बंद झाला आणि 30 मार्चपर्यंत दोन दिवस पैसे काढण्याची मुभा देण्यात आली होती. कंपनीने मंगळवारी शेअर बाजारांना माहिती दिली की, त्यांनी FPO अंतर्गत एकूण 4,300 कोटी रुपयांच्या 6,61,53,846 इक्विटी शेअर्सचे वाटप करण्यास मान्यता दिली आहे.
FPO गुंतवणूकदारांनी सुमारे 97 लाख बोली मागे घेतल्या
नियामक फाइलिंगनुसार, कंपनीचे पेड-अप इक्विटी शेअर भांडवल रु. 59,16,82,014 वरून 72,39,89,706 रुपये झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च रोजी गुंतवणूकदारांना त्यांच्या बोली मागे घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा सल्ला मार्केट वॉचडॉग सेबीने रुची सोयाला दिला. यानंतर FPO गुंतवणूकदारांनी सुमारे 97 लाख बोली मागे घेतल्या.
आम्हाला कोणाशीही स्पर्धा करायची नाही- बाबा रामदेव
एबीपी न्यूजला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, रामदेव यांनी स्पष्टपणे नमूद केले की पतंजली लवकरच जगातील सर्वात मोठी फूड कंपनी व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. आम्हाला कोणाशीही स्पर्धा करायची नाही. आम्हाला स्वतःशीच स्पर्धा करायची आहे. स्वयं-स्पर्धा, स्वयं-प्रेरणा ही आमच्या यशाची गुरुकिल्ली आहे,” बाबा रामदेव म्हणाले की, त्यांना खात्री आहे की लवकरच पतंजली भारतातील नंबर 1 फूड कंपनी बनण्याचे लक्ष्य साध्य करेल