एक्स्प्लोर

शेअर बाजारात पडझड; Landmark Cars आणि Abans Holdings ची लिस्टिंग, गुंतवणूकदारांना किती झाला फायदा?

Landmark Cars and Abans Holdings Shares Price: आज शेअर बाजारात Landmark Cars आणि Abans Holdings या कंपन्या बाजारात सूचीबद्ध झाल्या. मात्र, गुंतवणूकदारांची निराशा झाली.  

Landmark Cars and Abans Holdings Shares Price:  कोरोना संकटाच्या भीतीमुळे भारतीय शेअर बाजारात पडझड सुरू असल्याचे दिसून येत आहे. शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीमुळे अस्थिरतेचे वातावरण आहे. तर, दुसरीकडे आज कंपन्यांची शेअर बाजारात लिस्टिंग झाली. Landmark Cars आणि Abans Holdings या दोन कंपन्या बाजारात लिस्ट झाल्या. मात्र, लिस्टिंगनंतर या आयपीओत शेअर्स मिळालेल्या गुंतवणूकदारांच्या हाती निराशा लागली.

Landmark Cars कंपनीचा शेअर हा डिस्काउंट दरावर बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध झाला. लँडमार्क कार्सचा शेअर बीएसईवर 471.30 रुपये आणि एनएसईवर 471 रुपयांवर सूचीबद्ध झाला. या दोन्ही निर्देशांकावर अनुक्रमे 6.86 टक्के आणि 6.92 टक्क्यांनी सूचीबद्ध झाला. लँडमार्क कार्स कंपनीने आयपीओमध्ये प्रति शेअर 506 रुपये प्रति शेअर इतका दर निश्चित केला होता. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लँडमार्क कार्सचा शेअर दर 8 टक्क्यांच्या घसरणीसह 464.35 रुपयांवर व्यवहार करत होता. 

Landmark Cars च्या आयपीओला गुंतवणुकदारांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 8.71 पटीने,  बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा 1.32 पटीने आणि किरकोळ गुंतवणुकदारांचा कोटा 0.59 पटीने सब्सक्राइब झाला होता. कंपनीने आयपीओत अधिक व्हॅल्यूएशन केल्यामुळे आयपीओला कमी प्रतिसाद मिळाला असल्याची चर्चा आहे. 

Abans Holdings कडूनही निराशा

Abans Holdings कंपनी आज बाजारात सूचीबद्ध झाली. Abans Holdings या कंपनीचा शेअर एनएसईवर 270 रुपयांवर आणि बीएसईवर 273 रुपयांवर सूचीबद्ध झाला. Abans Holdings ने आपल्या आयपीओत प्रति शेअर 270 रुपये इतका शेअर दर निश्चित केला होता. क

Abans Holdings च्या शेअर दरातनंतर मोठी घसरण दिसून आली. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास 14.76 टक्क्यांच्या घसरणीसह 230.20 रुपयांवर व्यवहार करत होता. Abans Holdings ही कंपनी गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहे. 

शेअर बाजारात घसरण 

जागतिक शेअर बाजारात झालेली (Indian Share Market) पडझड आणि कोरोना महासाथीची (Coronavirus) भीती याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे. अमेरिकन शेअर बाजार (US Share Market) घसरणीसह बंद झाला. तर, आशियाई शेअर बाजारातही नकारात्मक संकेत आहेत. त्याच्या परिणामी आज भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीत (Nifty) मोठी घसरण दिसून येत आहे. निफ्टी निर्देशांक 18000 अंकांखाली व्यवहार करत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवादMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
Sharad Pawar Speech: शरद पवार 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत? भाषणांमधील दोन फॅक्टर्सची जोरदार चर्चा
शरद पवार 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत? भाषणांमधील दोन फॅक्टर्सची जोरदार चर्चा
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
×
Embed widget