Stocks to Watch : सोमवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या उलटफेरांची शक्यता, 14 स्टॉक्सची यादी पाहा
शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये शुक्रवारी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आता येत्या आठवड्यात या 14 स्टॉक्सवर गुंतवणूकदारांची नजर असेल.

मुंबई : शेअर बाजारात शुक्रवारी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये घसरण झाली. 7 जुलै ते 11 जुलै या कालावधीत सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 8 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं. तर, 2 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं आहे. सोमवार म्हणजेच 14 जुलैपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात शेअर बाजारात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. शुक्रवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी एप्रिल ते जून या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कंपन्यांच्या स्टॉक्सवर येत्या आठवड्यात लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
बीईएमएल लिमिटेड या सरकारी कंपनीच्या बोर्डानं 21 जुलै 2025 ला स्टॉक स्प्लिट करण्याबाबत विचार करण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं. ही माहिती कंपनीनं 11 जुलै रोजी दिली होती. कंपनीच्या सर्व शेअरची दर्शनी किंमत 10 रुपये आहे.
डीमार्टच्या सुपरमार्केटच्या चेनची मालक कंपनी अवेन्यू सुपरमार्टसनं 11 जुलैला मार्केट बंद झाल्यानंतर एप्रिल- जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यावर सोमवारी प्रतिक्रिया येऊ शकते. कंपनीचा नफा वार्षिक आधारावर घटला आहे.
ग्लेनमार्क फार्मा कंपनीच्या इंदौरच्या प्लांटला यूएसएफडीएनं एक वॉर्निग लेटर जारी केलं आहे. या प्लांटचं इन्स्पेक्शन 3-14 फेब्रुवारी 2025 लाकरण्यात आलं होतं. ग्लेनमार्क फार्मा कंपनीनं या लेटरचा इंदौरच्या प्लांटच्या पुरवठ्यावर किंवा उत्पन्नावर परिणाम होणार नाही असं म्हटलं.
कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडनं महाराष्ट्र विक्रीकर विभागासोबत सुरु असलेली एक केस जिंकली आहे. ही केस 4131 कोटी रुपयांच्या करांच्या मागणी संदर्भात होती.
NCC LTD या बांधकाम क्षेत्रातील कंपनीला मुंबई मेट्रो लाईन 6 च्या एका टप्प्याच्या कामाचं कंत्राट मिळालं आहे. हे कंत्राट 2269 कोटी रुपयांचं कंत्राट मिळालं आहे. यामुळं या कंपनीच्या स्टॉकमध्ये वाढ होऊ शकते.
अजमेरा रिअल्टी कंपनीची एप्रिल- जून 2025 च्या तिमाहीत विक्री 65 टक्क्यांनी घटली. कंपनीचं कलेक्शन 42 टक्क्यांनी वाढून 234 कोटी रुपये झालं. सोमवारी या कंपनीच्या स्टॉकवर सर्वांचं लक्ष असेल.
सुला विनयार्डसनं देखील जून 2025 ला तिमाहीतील कंपनीच्या कामगिरीचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. कंपनीचा निव्वळ उत्पन्न 7.9 टक्क्यांनी घसरुन 118.3 कोटी रुपये झालं.
आयआरबी इन्फ्रास्ट्र्क्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी आणि त्याची लिस्टेड InvIT जॉईंट वेंचर आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर ट्र्स्टनं एप्रिल जून 2025 च्या तिमाहीत 1680 कोटींचं उत्पन्न मिळवलं. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत उत्पन्न 8 टक्क्यांनी वाढलं आहे.
वोकहार्ट लिमिटेड कंपनीनं अमेरिकेतली जेनेरिक फार्मा कंपनीसोबतच्या भागीदारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.या कंपनीला 2024-25 ला जेनेरिक व्यवसायात 80 लाख डॉलर्सचं नुकसान झालं होतं
RITES LTD या कंपनीला कर्नाटकात काही स्थानांवर शासकीय फर्स्ट ग्रेड कॉलेजेसच्या बांधकाम आणि नुतनीकरणासाठी 46.82 कोटींचं कंत्राट मिळालं आहे.
निओजेन केमिकल्सनं नॉन क्यूमुलेटिव, नॉन कनवर्टिबल डिबेंचर जारी करुन 200 कोटी रुपयांची उभारणी करण्यास मंजुरी दिली आहे. अदानी ग्रीन एनर्जी शेअर वॉरंटच्या रुपांतराद्वारे प्रमोटरच्या समुहात एंटिटी ऑर्डर इनवेस्टमेंट लिमिटेडला 1.08 कोटी इक्विटी शेअर अलॉट केलं आहे. या बदल्यात 1208.59 कोटी रुपये उभे केले आहेत.
विष्णू प्रकाश आर पुंगलिया कंपनीला एका नव्या बांधाक प्रकल्पाचं काम मिळालं आहे. हे कंत्राट 77.9 कोटी रुपयाचं आहे. हा प्रकल्प जयपूरमध्ये आहे. अंबर एंटरप्रायझेस कंपनीच्या बोर्डानं सिक्युरिटीज जारी करत 2500 कोटी रुपयांचा फंड उभा करण्यास मंजुरी दिली होती.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


















