एक्स्प्लोर

SIP : एसआयपीचा शेअर बाजाराला आधार, नोव्हेंबरमध्ये SIP तून 29445 कोटी रुपयांची गुंतवणूक, आकडेवारी समोर

SIP inflow : भारतीय शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदार पैसे काढून घेत असताना एसआयपीच्या माध्यमातून रिटेल गुंतवणूकदार आधार देत आहेत.

Mutual Fund SIP : भारतीय शेअर बाजाराला देशांतर्गत रिटेल गुंतवणूकदारांकडून मोठा आधार मिळतोय. मुच्युअल फंडमध्ये सिस्टीमेटिक इन्वेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणूक करण्याचा पर्याय लोकप्रिय झाला आहे. भारतात अर्थसाक्षरतेचं प्रमाण ज्या प्रकारे वाढतंय त्यानुसार एसआयपीवरील रिटेल गुंतवणूकदाराांचा विश्वास वाढत चालला आहे. नोव्हेंबर  2025 मध्ये म्युच्युअल फंडमध्ये 29445 कोटी रुपयांची गुंतवणूक एसआयपीद्वारे झाली. ऑक्टोबर महिन्यात 29529 कोटी रुपयांची गुंतवणूक एसआयपीद्वारे आली होती. 

नोव्हेंबर महिन्यात एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये 29445 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये  गुंतवणूक कमी झाली असली तर वार्षिक आधारावर 21.7 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाचे प्रमुख  वेंकट चलसानी यांच्या मते नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस वीकेंड असल्यानं गुंतवणूक डिसेंबर महिन्यात गेली. 

नोव्हेंबर महिन्यात 57.14 लाख नव्या एसआयपी सुरु झाल्या. तर, 43.19 लाख एसआयपी कालावधी पूर्ण झाल्यानं बंद झाल्या. यानुसार स्टॉपेज गुणोत्तर 75.66 टक्के राहिलं. नोव्हेंबरमधील सक्रीय एसआयपी खात्यांची संख्या 9 कोटी 43 लाख झाली. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये सक्रीय एसआयपी खाती कमी झाली आहेत. एसआयपीद्वारे असेट अंडर मॅनेजमेंटची रक्कम 16.53 लाख कोटी रुपये झाली.

एसआयपीमधील गुंतवणूक का फायदेशीर?

बीपीएन फिनकॅपचे संचालक ए. के. निगम यांच्या मते एसआयपीची वाढती लोकप्रियता आर्थिक साक्षरता, सोपी फिनटेक एप्स, बाजाराची मजबुती, शिस्तबद्ध गुंतवणूक, कम्पाऊंडिंग आणि गुंतवणुकीतील लवचिकता यामुळं वाढली आहे. 

सोशल मीडिया, यूट्यूब आणि इतर प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक आणि ट्रेडिंगची माहिती वाढल्यानं लोक एसआयपी रत आहेत. AMFI सारख्या संस्था, वित्तीय संस्था आणि इतर संघटनांच्या अभियानामुळं युवा गुंतवणूकदार, छोट्या शहरातील गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता वाढली आहे. विविध अॅप्स उपलब्ध झाल्यानं गुंतवणूक प्रक्रिया सोपी झाली आहे. भारतीय शेअर बाजार मजबूत झाल्यानं गुंतवणूकदारांचा विश्वास देखील वाढला आहे. एसआयपीमुळं गुंतवणूकदारांना नियमित गुंतवणूक करण्याची सवय लागते. ज्यामुळं बाजारातील तेजी आणि घसरणीचा परिणाम कमी होतो. एसआयपीद्वारे केलेल्या गुतंवणुकीत व्याजावर व्याज मिळतं. आर्थिक जाणकारांच्या मते एसआयपीद्वारे विक्रमी गुंतवणूक होत असल्यानं आर्थिक साक्षरता वाढल्याचं पाहायला मिळतं. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Embed widget