एक्स्प्लोर

 Share Market Rise:  सेन्सेक्समध्ये उसळी, निफ्टी 25000 च्या जवळ, 'या' 7 कारणांमुळं शेअर बाजारात जोरदार तेजी 

Share Market Rally:  भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. ऑटो कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. 

Share Market Rally मुंबई : भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. ऑटो कंपन्यांच्या शेअरमध्ये तजी, जागतिक बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेतामुळं गुंतवणूकदारांवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला. आज बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 370.64 अंकांनी किंवा 0.46 टक्क्यांनी वाढून 81644.39 वर बंद झाला. तर, निफ्टी 50 निर्देशांकानं 25 हजारांचा टप्पा पार केल्याचं पाहायला मिळालं. निफ्टी 50 निर्देशांक 103.70 अंकांच्या तेजीसह 24980.65 वर बंद झाला. निफ्टीवर टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी पोर्टस, बजाज ऑटो, इटरनलच्या शेअरमध्ये 4 टक्क्यांपर्यंत तेजी पाहायला मिळाली.   

तज्ज्ञांच्या मते शेअर बाजारातील तेजीमागं प्रमुख 7 कारणं आहेत

 1. ऑटो शेअरमध्ये सातत्यानं तेजी

ऑटो क्षेत्रातील शेअरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. ओला इलेक्ट्रिक, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प,ह्युंदाई मोटर्स, आयशर मोटर्स आणि मारुती सुझुकी सारख्या कंपन्यांच्या शेअरमध्ये 6 टक्क्यांपर्यंत तेजी पाहायला मिळाली. निफ्टी ऑटो निर्देशांकात जवळपास 1 टक्क्यांची वाढ झाली. सोमवारी ऑटो निर्देशांकात 5 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. सरकार टू-व्हीलर्स आणि छोट्या कारवरील जीएसटीच्या दरांमध्ये कपात करु शकते. यामुळं वाहनांच्या विक्रीत तेजी पाहायला मिळू शकते. याशिवाय चीननं भारतावर रेअर अर्थ मॅग्नेटच्या पुरवठ्यामधील अडचणी दूर करण्याचा विश्वास दिला आहे. याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला.
  
2. रिलयान्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये तेजी

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 2 टक्क्यांहून अधिक तेजी पाहायला मिळाली. यामुळं सेन्सेक्स आणि निफ्टीमधील तेजीला मदत झाली. जिओ टेलिकॉमनं प्रीपेडच्या टॅरिफमध्ये बद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. 
 
3. मजबूत जागतिक संकेत

जागतिक बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेतामुळं बाजारात तेजी पाहायला मिळाली. आशियाई शेअर बाजारात शांघाई स्टॉक एक्सचेंज कंपोझिट इंडेक्स आणि हाँगकाँगच्या हँगसँग निर्देशांकात तेजी पाहायला मिळाली.   

4. रशिया यूक्रेन युद्ध संपण्याच्या दिशेनं

रशिया आणि यूक्रेनं यांच्यात चर्चा होण्याची शक्यता वाढल्यानं बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना शांततापूर्ण मार्ग काढण्याचं आवाहन केलं आहे. बाजार विश्लेषकांच्या मते जर रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध संपण्याच्या दिशेनं चर्चा पुढं गेल्यास भारतावर रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं अमेरिकेनं लादलेले टॅरिफ कमी होऊ शकतं.  

5. क्रूड ऑईलचे दर घसरले

कच्च्या तेलाच्या दरात झालेली घसरण हे बाजारासाठी सकारात्मक संकेत आहेत. ब्रेंट क्रूड फ्यूचर्समध्ये 0.50 टक्क्यांची घसरण होऊन ते 66.24 डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत. क्रूड ऑईलचे दर घसरल्यानं भारताचा आयातीचा खर्च कमी होऊ शकतो.  

6. विदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदी

विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारातून 550.85 कोटी रुपयांची खरेदी केली. त्यामुळं गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला.

7. रुपया मजबूत होणं 

भारतीय रुपया मंगळवारी 19 पैशांनी मजबूत होऊन 87.20 प्रति डॉलरवर पोहोचला. 

जियोजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे चीफ मार्केट रणनीतीकार आनंद जेम्स यांनी म्हटलं की निफ्टी 50 चा सिंपल मूविंग एवरेज 25013 वर आहे. जोपर्यंत 24850 च्यावर निफ्टी 50  निर्देशांक आहे तोपर्यंत तेजी कायम आहे, असं म्हटलं जाऊ शकतं.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget