एक्स्प्लोर

GST मध्ये सुधारणा झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? नव्या बदलानंतर दारु, सिगारेट महागण्याची शक्यता

GST : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जीएसटीमध्ये सुधारणा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. नव्या सुधारणांमध्ये काय बदल असतील याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना जीएसटीमधील बदलांबाबत भाष्य केलं होतं. दिवाळी किंवा त्यानंतर जीएसटीमध्ये मोठ्या सुधारणा पाहायला मिळणार आहेत. येत्या काळात जीएसटीमध्ये मोठे बदल केले जातील, असं नरेंद्र मोदी मोदी म्हणाले. जीएसटीमध्ये 5 टक्के आणि 18 टक्के हे दोन स्लॅब ठेवल्यास अनेक वस्तूंच्या किमती घसरु शकतात. जीएसटीमधील फेरबदलांची चर्चा सुरु असताना पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का अशा चर्चा देखील सुरु आहेत. मात्र, पेट्रोल आणि डिझेलवरील करांमधून राज्य सरकार आणि केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळतं, त्यामुळं पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत लगेच आणलं जाण्याची शक्यता कमी आहे.

बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार एका अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं की पेट्रोलियम उत्पादनांना जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी वेळ लागेल. म्हणजे जीएसटी 2.0 लागू झालं तरी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी होणार नाहीत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार नाही.

तंबाखू आणि दारुवरील जीएसटी वाढणार?

वित्त मंत्रालयानं विशेष रेटसह दोन जीएसटी स्लॅबचा प्रस्ताव ग्रुप ऑफ मिनिस्टर्सला पाठवला आहे. रिपोर्टनुसार सिगारेट, तंबाखू आणि दारु यावर 40 टक्के जीएसटी लागू शकतो. जर हा निर्णय झाला तर दारु, सिगारेट आणि तंबाखूसाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात.

पेट्रोल-डिजेल वरील करांमधून सरकारची जोरदार कमाई

पेट्रोलियम उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात कर लावून सरकार उत्पन्न मिळवत असते. पेट्रोलियम उत्पादनांशिवाय दारु, तंबाखूवर कर लावून देखील सरकार पैसे कमवत असतं. केंद्र सरकार जीएसटीसंदर्भातील अंतिम निर्णय घेण्यापूर्वी विचारविनिमय करेल. जीएसटी परिषदेची बैठक सप्टेंबर महिन्यात होणार आहे. आता जीएसटी मंत्री परिषदेच्या बैठकीत कोणत्या प्रस्तावावर सहमती होते ते पाहावं लागेल.

जीएसटीचे सध्या चार स्लॅब किंवा टप्पे आहेत. त्याच्या जागी 5 टक्के आणि 18 टक्के अशा दोन स्लॅबचा प्रस्ताव देण्यात आला आहे. केंद्र सरकारनं याबाबत तीन वर्षांपासून काम सुरु आहे. दोन स्लॅब लागू झाल्यानंतर दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या वस्तुंच्या किंमतीवर परिमाम होईल. लोकांचा खर्च कमी होऊन पैशांची बचत होऊ शकते. दोन स्लॅबच्या निर्णयासाठी अगोदरच मंत्रिगट स्थापन करण्यात आला आहे. जीएसटी स्लॅबमध्ये बदल केल्यानंतर सर्वसामान्य व्यक्तींना होणारा फायदा आणि अर्थव्यवस्थेवरील सकारात्मक परिणाम अपेक्षित आहे.

सरकारच्या मते जीएसटी स्लॅब मधील बदल प्रामुख्यानं गरीब, मध्यमवर्गातील लोक, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना लक्षात ठेवत घेण्यात येणार आहे. यामुळं दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या वस्तूंच्या किमती कमी होतील.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale : लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
Multibagger Stock : एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Embed widget