Stock Market Closing: शेअर बाजारात तेजी, स्टेट बँकेच्या शेअरमध्ये उसळी, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 7 लाख कोटींची वाढ
Stock Market Closing: शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. आज शेअर बाजारात सेन्सेक्स 1900 अंकांनी वधारला.
मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून घसरण पाहायला मिळत होती. गुंतवणूकदारांना मोठं नुकसान सहन करावं लागतं होतं. आज भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला तर निफ्टीमध्ये देखील 571 अंकांची उसळी पाहायला मिळाली. यामुळं एकाच दिवसात 7 लाख कोटी रुपयांनी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.
अदानींच्या ऊर्जेसंबंधित कंपन्यांचे समभाग सोडता इतर कंपन्यांचे समभाग पुन्हा एकदा वधारले आहेत. अदानी पॉवर, अदानी ग्रीन, अदानी एनर्जी आणि अदानी विल्मारच्या समभागात घसरण झाली आहे. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्टच्या समभागांमध्ये तेजी पाहायला मिळाली.
नोव्हेंबर सीरीजच्या एक्सपायरीच्या दिवशी मिडकॅप आणि स्मॉलकॅपच्या शेअर्ससमध्ये खरेदी वाढल्यानं तेजी पाहायला मिळाली.बॅकिंग, आयटी, रिअल इस्टेटसह सर्व क्षेत्रात तेजी पाहायला मिळाली. बँक निफ्टी 763 अकांनी वाढून 51135 वर बंद झाली. निफ्टीच्या सर्व क्षेत्रातील निर्देशांकात तेजी पाहायला मिळाली.
एनएसईवर निफ्टीमध्ये 557.35 अकांनी किंवा 2.39 टक्के वाढ पाहायला मिळाली. निफ्टी 50 निर्देशांक 23907 वर बंद झाली. बीएसईवर सेन्सेक्स 1961.32 अकांनी 2.54 टक्क्यांनी वाढून 79117 वर बंद झाला.
सेन्सेक्सवर शेअर बाजारातील टॉप 30 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. स्टेट बँक ऑफ इंडिया, टीसीएस, टायटन, आयटीसी, इन्फोसिस, एल अँड टी शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.
निफ्टी 50 मधील 49 शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. बजाज ऑटोच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. इतर सर्व कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. एसबीआय, बजाज फायनान्स, आयटीसी, टीसीएस आणि टायटन या कंपन्यांचा समावेश आहे.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 432.70 लाख कोटींवर पोहोचलं आहे. 7.41 लाख कोटी रुपयांची वाढ आज यामध्ये झाली. बीएसईवरील 4041 शेअर्सपैकी 2446 शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. तर,1475 शेअरमध्ये घसरण झाली.
अदानींच्या कंपन्यांच्या काही कंपन्यांना दिलासा
गौतम अदानी आणि इतर सात जणांविरोधात अमेरिकन न्यायालयानं अदानी ग्रीन एनर्जी प्रकरणात लाचखोरीचा आरोप केला होता. त्यानंतर काल अदानींच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. अदानी पॉवर, अदानी ग्रीन, अदानी एनर्जी आणि अदानी विल्मारच्या या कंपन्यांच्या शेअरमध्ये आज देखील घसरण पाहायला मिळाली. अदानी पोर्ट आणि अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.
इतर बातम्या :