Stock Market Prediction: शेअर बाजारात 'या' शेअरमध्ये तेजीचे संकेत, तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?
Stock Market Prediction: आज शेअर बाजारात PNB Housing सह काही कंपन्यांच्या शेअर दरात तेजी राहण्याचे संकेत आहेत.
Stock Market Prediction: भारतीय शेअर बाजारात (Share Market) मंगळवारी विक्रीचा सपाटा दिसून आल्याने मोठी पडझड झाली. बाजारात दुपारच्या सत्रामध्ये खरेदीचा जोर दिसून आल्याने बाजार बऱ्यापैकी सावरला. मात्र, त्यानंतरही सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक घसरणीसह बंद झाले. रिलायन्स इंडस्ट्री आणि टीसीएसमध्ये खरेदी झाल्याने बाजार सावरल्याचे चित्र आहे. सेन्सेक्समध्ये (BSE Sensex) मंगळवारी, 0.17 टक्क्यांची घसरण होऊन तो 61,702 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये (NSE Nifty) 0.18 टक्क्यांची घसरण होऊन तो 18,387 अंकांवर स्थिरावला.
सेन्सेक्स निर्देशांकात टाटा मोटर्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल, मारुती सुझुकी, एनटीपीसी, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स आणि टाटा स्टीलच्या शेअर दरात घसरण दिसून आली. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक या कंपन्यांचे शेअर्स वधारले होते.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी
Moving Average Convergence Divergence (MACD) इंडिकेटरनुसार,RHI Magnesita मध्ये तेजीचे संकेत दिसत आहेत. त्याशिवाय, PNB Housing, JK Paper, IIFL Finance, Adani Enterprises आणि Tube Investments या कंपन्यांच्या शेअर दरात तेजीचे संकेत दिसून येत आहेत. या कंपन्यांच्या शेअर्सने 52 आठवड्यातील उच्चांक ओलांडला आहे.
या कंपन्यांच्या शेअर दरात विक्रीचे संकेत
शेअर बाजारातील काही कंपन्यांच्या शेअर दरात घसरणीचे संकेत दिसत आहेत. Sterling and Wilson, Gland Pharma, Nykaa, Piramal Pharma आणि Sunteck Realty या कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून येत आहे. त्यामुळे या कंपन्यांचे शेअर दर घसरू शकतात.
MACD इंडिकेटर काय आहे?
MACD हे ट्रेंड रिव्हर्सलसाठी ओळखले जाते. MACD इंडिकेटरमध्ये सिग्नल लाइन ओलांडली की त्या शेअरमध्ये तेजी राहण्याचे संकेत समजले जातात. या MACD नुसार स्टॉकमधील संभाव्य तेजी आणि घसरण याचाही अंदाज लावता येतो.
(Disclaimer: ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या: