Share Market Opening : शेअर बाजारात दमदार सुरुवात! सेन्सेक्स 72500 पार, तर निफ्टी 22103 वर
Stock Market Updates : आज शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीची घोडदौड सुरु आहे.
Share Market Opening Bell : आज आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात (Stock Market) सकारात्मक संकेत दिसून येत आहे. आज बाजार सुरु होताच निफ्टी (Nifty) आणि सेन्सेक्सची (Sensex) घोडदौड सुरु आहे. सोमवारी बाजाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स 72500 पार, तर निफ्टी 22103 वर पोहोचला. शेअर मार्केटमध्ये आज सरकारी बँक आणि फार्मा सेक्टरमध्ये जोरदार खरेदी सुरु आहे. तर, आयटी सेक्टरचीही चांगली घोडदौड सुरु असल्याचं दिसून येत आहे. आज शेअर बाजारातील पहिल्या सत्रात इंडेक्स मजबुतीसह व्यवहार करताना पाहायला मिळाला. आयटी, बँक आणि फार्मा सेक्टरमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. बजाज ऑटो निफ्टीच्या टॉप गेनर शेअर्रमध्ये पोहोचला आहे.
शेअर बाजाराची चांगली सुरुवात
सोमवारी, 19 फेब्रुवारीला शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स 66 अंकांनी वाढून 72,493 वर उघडला तर, निफ्टी 42 अंकांनी वाढून 22,083 वर उघडला. शेअर बाजारासाठी नव्या व्यापार सप्ताहाची सुरुवात चांगल्या गतीने झाली. आयटी शेअर्समध्ये थोडा दबाव होता पण बँक शेअर्स वधारत राहिले. आर्थिक समभागांमध्येही चांगली वाढ दिसून आली. मात्र, बाजार उघडल्यानंतर अर्ध्या तासातच देशांतर्गत बाजार लाल रंगात घसरले आणि सेन्सेक्स 90 अंकांपेक्षा अधिक कमकुवत झाला.
'या' शेअर्समध्ये तेजी (Top Gainer Stocks)
ग्रासीम (Grasim), बजाज ऑटो, एदानी इंटरप्रायजेस, डॉ. रेड्डी लॅब्स, आयटीसी हे स्टॉक्स टॉप गेनर्स आहेत. याशिवाय बजाज फायनान्स, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, युपीएल, सीपला, कोल इंडिया या शेअर्समध्येही चांगली तेजी पाहायला मिळत आहे.
'या' स्टॉक्समध्ये घसरण (Top Loser Stocks)
टीसीएस (TCS), एसबीआय लाईफ इन्शुरन्स, लार्सेन, एचडीएफसी, वीप्रो या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. तसेच, LTI मीडट्री, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा या स्टॉक्समध्येही घसरण सुरु आहे.
अर्ध्या तासानंतर सेन्सेक्स-निफ्टी तोट्यात
बाजार सुरु झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासाने निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये घसरणी पाहायला मिळाली आणि सर्व नफा गमावला. सध्या सेन्सेक्स 91.26 टक्क्यांच्या घसरणीसह 72,335 ची पातळीवर व्यवहार करत आहे. 6.40 अंकांच्या घसरणीनंतर निफ्टी 22,034 वर व्यवहार करताना दिसत आहे. सकाळच्या घोडदौडीनंतर बाजारात आता घसरण सुरु आहे.
सोने आणि चांदीच्या किमतीतील चढ-उतारांवर अनेक घटकांचा प्रभाव पडतो, त्यापैकी सन्माननीय ज्वेलर्सचे इनपुट. सोन्याची जगभरातील इच्छा, देशांमधील चलन मूल्यांमधील तफावत, सध्याचे व्याजदर आणि सोन्याच्या व्यापारासंबंधीचे सरकारी नियम यासारखे घटक या बदलांमध्ये भूमिका बजावतात. शिवाय, जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती आणि इतर चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची क्षमता यासारख्या जागतिक घटनांचाही भारतीय बाजारातील सोन्याच्या किमतींवर प्रभाव पडतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Gold Rate Today : सोन्याला झळाळी, चांदी महागली! आज तुमच्या शहरातील सोने-चांदीचा लेटेस्ट दर काय?