Share Market Updates : शेअर बाजारात खरेदीचा जोर, सेन्सेक्स 250 अंकांनी वधारला, निफ्टीतही तेजी
Share Market Updates : शेअर बाजारात आज खरेदीचा जोर दिसत असून सेन्सेक्स वधारला आहे.
Share Market Updates : आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीने झाली. सेन्सेक्स निर्देशांक 250 अंकांनी तर निफ्टी निर्देशांक 60 अंकांनी वधारला. मंगळवारी देशातील किरकोळ महागाई दरात किंचित घट झाल्याचे समोर आले होते. त्याच्या परिणामी शेअर बाजारात खरेदीचा जोर असल्याचे म्हटले जात आहे.
आज सकाळी प्री-ओपन सत्रात बीएसई निर्देशांक सेन्सेक्स 323 अंकांनी म्हणजेच 0.6 टक्क्यांनी वधारत 54,147 अंकांवर सुरू झाला. तर, निफ्टी 50 मध्ये 53 अंकांची तेजी दिसून आली. निफ्टी 16111 अंकांवर सुरू झाला. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 223 अंकांनी वधारत 54,110.01 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 65 अंकांनी वधारला असून 16,123.50 अंकावर व्यवहार करत आहे.
मंगळवारी, शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये 508 अंकांची, तर निफ्टीमध्ये 157 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 0.94 टक्क्यांची घसरण होऊन तो 53,886 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.97 अंकांची घसरण होऊन तो 16,058 वर पोहोचला. मंगळवारी शेअर बाजारात 1436 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ नोंदवण्यात आली. तर, 1784 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. 157 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
मागील काही दिवसांपासून आशियाई शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू होता. मात्र, आज खरेदी सुरू असल्याचे दिसून आले आहे. जपान शेअर बाजाराचा निर्देशांक निक्कीमध्ये (Nikkei) 0.33 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, चीनच्या शांघाई शेअर बाजारही वधारला आहे. हाँगकाँगच्या Hangseng मध्ये 0.78 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: