टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून मुकेश अंबानी बाहेर, संपत्तीच्या बाबतीत अदानींची आघाडी
World top 10 Billionaires List: जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत मोठा फेरबदल झाला आहे. एकीकडे भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत झालेल्या घसरणीमुळे ते यादीतून बाहेर झाले आहेत.

World top 10 Billionaires List: जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत मोठा फेरबदल झाला आहे. एकीकडे भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत झालेल्या घसरणीमुळे ते यादीतून बाहेर झाले आहेत. तर दुसरीकडे वॉरेन बफे श्रीमंतांच्या यादीत नवव्या स्थानावर घसरले आहेत.
आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि दीर्घकाळ जगातील अव्वल अब्जाधीशांपैकी एक असलेले मुकेश अंबानी यांचा आता टॉप-10 श्रीमंतांमध्ये समावेश होणार नाही. त्यांच्या संपत्तीत झालेल्या घसरणीमुळे आता रिलायन्सचे चेअरमन 11 व्या क्रमांकावर घसरले आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अंबानींची एकूण संपत्ती आता 87.4 अब्ज डॉलरवर आली आहे. अब्जाधीश स्टीव्ह बाल्मर 88.1 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 10व्या स्थानावर पोहोचला आहेत.
टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट असलेले दुसरे भारतीय उद्योगपती गौतम अदानी पाचव्या स्थानावर अजूनही कायम आहेत. 105 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह अदानी यांनी आपले वर्चस्व कायम ठेवत जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती लॅरी पेज, लॅरी एलिसन यांना मागे टाकत पुढे निघाले आहेत. ते आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.
अब्जाधीशांच्या यादीतील या बदलामुळे दोन्ही भारतीय उद्योगपतींच्या संपत्तीबद्दल बोलताना गौतम अदानी आता मुकेश अंबानींच्या खूप पुढे गेले आहेत. दोन्ही श्रीमंतांच्या संपत्तीत 17.6 बिलियनचे अंतर आहे. असं असलं तरी अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) अजूनही मार्केट कॅपनुसार देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे.
दरम्यान, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क 237.9 अब्ज डॉलर्स संपत्तीसह जगातील अब्जाधीशांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. त्यापाठोपाठ 149.3 अब्ज डॉलर्स संपत्तीसह फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अरनॉल्ट, तर Amazon चे जेफ बेझोस 141.2 बिलियन डॉलर्ससह तिसऱ्या स्थानावर आहेत. तर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स 124.6 अब्ज डॉलर्स संपत्तीसह यादीत चौथ्या स्थानावर आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Adani : अदानी समूह टेलिकॉम उद्योगात उतरण्याच्या तयारीत, 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात घेणार भाग
- Petrol-Diesel Price : आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, गाडीची टाकी फुल्ल करण्यासाठी किती रुपये मोजाल?
- 5G Services Rollout Soon : 5G मोबाईल सेवा लवकरच होणार सुरु; केंद्र सरकारकडून 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
