Share Market Opening Bell: सुरुवातीच्या घसरणीनंतर सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारात अस्थिरता राहण्याचे संकेत
Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली असली तरी त्यानंतर बाजार सावरला.
Share Market Opening Bell: आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली. मात्र, काही वेळेनंतर बाजार सावरू लागला. मागील आठवड्यात व्यवहाराच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीचा (Nifty) उच्चांक गाठला होता. आज बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. जागतिक पातळीवरील शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. आशियाई बाजारातही अस्थिरतेचे संकेत दिसत आहेत.
आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 277.29 अंकांच्या घसरणीस 62,016.35 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 82.20 अंकांच्या घसरणीसह 18,430.55 अंकांवर खुला झाला. बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाल्यानंतर काही वेळाने बाजार सावरला. सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 80 अंकांनी वधारत 62,373.67 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 21 अंकांनी वधारत 18,534.20 अंकांवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 22 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, आठ कंपन्यांच्या शेअर दरात विक्रीचा दबाव असल्याचे दिसून आले. तर, निफ्टी 50 मधील 35 कंपन्यांचे शेअर दर वधारले आहेत. तर, 13 कंपन्यांचे शेअर दर घसरले आणि दोन कंपन्यांच्या शेअर दर स्थिर होते.
बँक निफ्टीत सकाळी 9.55 वाजण्याच्या सुमारास 118 अंकांची घसरण दिसून आली. बँक निफ्टी निर्देशांक 42,865 अंकांवर व्यवहार करत होता.
निफ्टी निर्देशांकात बीपीसीएलचा शेअर 3.78 टक्के, एसबीआय लाइफ 2.50 टक्के, हिरोमोटो कॉर्प 1.86 टक्के, रिलायन्स 1.74 टक्के, बजाज ऑटो 1.04 टक्क्यांनी शेअर दरात तेजी दिसत आहे. तर, हिंदाल्कोच्या शेअर दरात 2.08 टक्के, अपोलो हॉस्पिटल 2.06 टक्के, एचडीएफसीच्या शेअर दरात 1.65 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.
शेअर इंडियाचे उपाध्यक्ष, संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. रवी सिंह यांनी म्हटले की, आज बाजार 18300-18600 दरम्यान व्यवहार करण्याची शक्यता आहे. बाजारात आज नफावसुली दिसण्याची शक्यता आहे. मीडिया, रियल्टी, ऑटो, फार्मा आणि रियल्टीच्या शेअर दरात तेजी राहण्याची शक्यता आहे. तर, एफएमसीजी, वित्तीय सेवा, बँक, आयटी आणि फार्माच्या शेअर दरात विक्रीचा जोर दिसून येऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: