एक्स्प्लोर

Share Market Opening Bell : शेअर बाजारात अस्थिरतेचे संकेत; गुंतवणूकदारांचा विक्रीसाठी दबाव

Share Market Opening Bell : शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत मिळत असून बाजारात गुंतवणूकदारांचा विक्रीसाठी दबाव वाढत आहे.

Share Market Opening Bell : शेअर बाजारात आज बाजार वधारला (Share Market) असला तरी अस्थिरतेचे संकेत दिसत आहेत.  प्री-ओपनिंगमध्ये बाजारात तेजी दिसून आली होती. त्यानंतरही सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांक वधारला होता. मात्र, त्यात घसरण झाली. सेन्सेक्स आज 59,285 अंकावर आणि निफ्टी 17,695 अंकांवर खुला झाला होता. 

शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्सने 59,566 चा टप्पा गाठला. तर, निफ्टीने 17700 अंकांचा टप्पा गाठला. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 12.40 अंकांनी वधारत 59,258.38 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी निर्देशांक 4 अंकांच्या तेजीसह 17,670.55 अंकांवर व्यवहार करत होता.  

सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 पैकी फक्त 3 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली होती. त्यानंतर निफ्टी 50 मधील एक कंपनीच्या शेअर दरात घसरण दिसून आली. बँक निफ्टीतही 164 अंकांची तेजी दिसून आली. 

सेन्सेक्समधील पॉवरग्रीडमध्ये सर्वाधिक 1.50 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, रिलायन्समध्येही एक टक्क्यांची तेजी दिसत आहे. त्याशिवाय, एल अॅण्ड टी, भारती एअरटेल, मारूती, बजाज फायनान्स, एचयूएल, एचडीएफसी बँकेच्या शेअर दरात तेजी दिसत आहे. त्याशिवाय, टायटन, एचडीएफसी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, अल्ट्राटेक सिमेंट, अॅक्सिस बँक, एशियन पेंट्स, एसबीआय, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, आयटीसी, एचसीएल, सन फार्मा, टाटा स्टील आणि इन्फोसिसच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. 

कोटक महिंद्रा, टीसीएस, टेक महिंद्रा, नेस्ले आणि विप्रोच्या शेअर दरात घसरण झाली आहे. 

सोमवारी बाजारात तेजी 

खरेदीचा जोर असल्याने शेअर बाजारात (Share Market) सोमवारी तेजी दिसून आली. सेन्सेक्सने (Sensex) पुन्हा एकदा 59, 000 अंकांचा टप्पा ओलांडला. बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 442 अंकांच्या तेजीसह  59,245 अंकांवर, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक (NSE) निफ्टीमध्ये (NIFTY) 126 अंकांची तेजी दिसून आली. निफ्टी 17,665 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टीतही सर्व 12 स्टॉक्समध्ये तेजी दिसली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Embed widget