Share Market News: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 150 अंकांनी घसरला, निफ्टी 40 अंकांनी खाली
Share Market News : चीनमधील कोव्हिड प्रतिबंधात्मक नियम शिथिल केल्यानंतर कच्च्या तेलाचे भाव पुन्हा एकदा वधारल्याचे पाहायला मिळाले
Share Market News : अमेरीका आणि आशियाई बाजारातील खराब सुरुवातीचा भारतीय बाजाराला (Stock Market Opening) फटका बसला आहे. आज शेअर बाजारात (Share Market) घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 150 अंकांनी घसरला, निफ्टी 40 अंकांनी खाली आला आहे. शेअर बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 82.84 वर उघडला.
शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने
जागतिक बाजारातून कोणतेही सकारात्मक संकेत न मिळाल्याने भारतीय बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली आणि सेन्सेक्स 100 हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला. आजच्या शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली आहे. शेअर बाजारात बीएसईचा 30 शेअर्सचा इंडेक्स सेन्सेक्स 115.91 अंकांनी म्हणजेच 0.19 टक्क्यांनी घसरून 60,811.52 वर उघडला. दुसरीकडे, NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 40 अंकांनी खाली आला आहे.
कच्च्या तेलाचे भाव पुन्हा वधारले
चीनमधील कोव्हिड प्रतिबंधात्मक नियम शिथिल केल्यानंतर कच्च्या तेलाचे भाव पुन्हा एकदा वधारल्याचे पाहायला मिळाले, ब्रेंट क्रूड 85 डॉलर प्रति बॅरलवर उघडला. ओएनजीसी, हिंदाल्को, इन्फोसिस, एचसीएल टेकसारख्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.
शेअर बाजाराची आजची सुरुवात लाल चिन्हातच
प्री-ओपनिंगच्या संकेतांमुळे शेअर बाजाराची आजची सुरुवात लाल चिन्हातच झाल्याचे दिसत होते. काल रात्री अमेरिकन बाजारात घसरणीसह नॅस्डेक बंद झाला. ज्यानंतर आज सकाळी आशियाई बाजारांमध्ये संमिश्र व्यवसाय दिसून आला. आज हँगसेंग घसरणीसह व्यवहार करत आहे आणि तैवानच्या बाजारात घसरण दिसून येत आहे.
सेन्सेक्स आणि निफ्टी शेअर्सची स्थिती
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 16 शेअर्स घसरणीसह आणि उर्वरित 14 समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत. निफ्टीच्या 50 पैकी 17 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. तर 31 शेअर्समध्ये घसरणीचे लाल चिन्ह दिसत आहे. 2 शेअर्स कोणताही बदल न करता व्यवहार करत आहेत.
कोणते स्टॉक तेजीत आहेत?
सेन्सेक्स शेअर्सवर नजर टाकली तर आज पॉवरग्रीड, एनटीपीसी, टायटन, एशियन पेंट्स, एचडीएफसी, एम अँड एम, इंडसइंड बँक, एल अँड टी, सन फार्मा, मारुती आणि बजाज फायनान्स तेजीसह व्यवहार करत आहेत.
कोणत्या स्टॉकमध्ये घसरण?
जर तुम्ही निफ्टीच्या पहिल्या पाच घसरलेल्या शेअर्सवर नजर टाकली तर ओएनजीसी, टीसीएस, इन्फोसिस, बीपीसीएल आणि बजाज फिनसर्व्ह 0.90 ते 0.75 टक्क्यांच्या दरम्यान घसरताना दिसत आहेत.
मार्केटचे प्री-ओपनिंग कसे होते?
निफ्टी आणि सेन्सेक्स आज शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंगमध्ये लाल चिन्हावर व्यवहार करत आहेत. BSE चा सेन्सेक्स 155.44 अंकांनी म्हणजेच 0.26 टक्क्यांनी घसरला.
60771.99 च्या पातळीवर दिसत होता. याशिवाय, NSE चा निफ्टी 56.45 अंकांच्या म्हणजेच 0.31 टक्क्यांच्या घसरणीसह 18075.85 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
इतर बातम्या