शेअरची किंमत फक्त 1 रुपया, पण गुंतवणूकदारांची होतेय भरघोस कमाई, ही कंपनी देणार बंम्पर रिटर्न्स?
सध्या शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळतोय. मात्र या कंपनीने गेल्या काही दिवसांत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलेला आहे.
मुंबई : सध्या शेअर बाजारात (Share Market) चढऊतार चालू आहे. या अस्थिरतेत अनेक गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. याच काळात काही गुंतवणूकदारांनी मात्र चांगले पैसे कमवले आहेत. दरम्यान, शेअर बाजारात चढऊतार होत असला तरी असे काही शेअर्स आहेत, जे आपल्या गुंतवणूकदारांना सलग चांगला परतावा देत आहेत. या कंपनीने एका वर्षात गुंतवणूकदारांना साधारण 132 टक्क्यांनी रिटर्न दिले आहेत. स्प्रेकिंग लिमिटेड (Sprayking Ltd) असे या कंपनीचे नाव आहे.
गुंतवणूकदार झाले मालामाल
स्प्रेकिंग लिमिटेड या कंपनीने एका वर्षात साधारण 132 टक्के रिटर्न दिलेले आहेत. 2020 सालच्या एप्रिल महिन्यात या शेअरचे मूल्य 1.60 रुपये होते. आता याच कंपनीच्या शेअरचे मूल्य गेल्या शुक्रवारी 46.89 रुपये झाले आहे. म्हणजेच गेल्या चार वर्षांत गुंतवणूक केलेल्या लोकांना आज चांगला परतावा मिळाला असेल.
कंपनीची आर्थिक स्थिती काय?
या कंपनीच्या आर्थिक स्थितीबाबत सांगायचं झाल्यास डिसेंबरच्या तिमाहीत या कंपनीचा निव्वळ नफा हा 58 टक्क्यांनी कमी झाला होता. या तिमाहीत कंपनीच्या विक्रीतही घट झाली होती. ही विक्री वर्षाच्या हिशोबाने 54.27 टकक्यांनी कमी होऊन 2.41 कोटी रुपये झाली होती. या कंपनीकडून पितळ या धातूची निर्मिती केली जाते. या कंपनीला अगोदर स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट या नावाने ओळखले जायचे. फिटिंग, फोर्जिंग इक्विपमेंट्स, ट्रान्सफॉर्मस आदी उत्पादने या कंपनीकडू घेतली जायची.
सध्या मिळतायत चांगले रिटर्न्स
गेल्या पाच दिवसांपासून स्प्रेकिंग लिमिटेड या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 33 टक्के रिटर्न्स दिले आहेत. गेल्या एका महिन्यात या कंपनीने गुंतवणूकदारांना पाच टक्के रिटर्न्स दिले आहेत. गेल्या सहा महिन्यांत या कंपनीने गुंतवणूकदारांना 17 टक्क्यांनी परतावा दिलेला आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
मुथूट फायनान्सची उपकंपनी बेलास्टारचा लवकरच येणार आयपीओ, भरघोस नफा मिळवण्याची नामी संधी!
फॉर्म-1 ते फॉर्म-4 आयटीआर भरण्यासाठी कोणासाठी कोणता फॉर्म? जाणून घ्या...
क्रेडिट कार्ड वापरताय? 'या' पाच गोष्टी टाळा, अन्यथा अडकू शकता कर्जाच्या विळख्यात!