एक्स्प्लोर

Stock Market Closing: होळीत गुंतवणूकदारची चांदी, बाजार मोठ्या उसळीने बंद, सेन्सेक्स 60,000 पार

Stock Market Closing On 6th March 2023: धुळवडीच्या दिवशी बाजार बंद असला तरी गुंतवणूकदारांवर आज चांगलाच होळीचा रंग चढला आहे. आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांची जबरदस्त खरेदी झाली.

Stock Market Closing On 6th March 2023: धुळवडीच्या दिवशी बाजार बंद असला तरी गुंतवणूकदारांवर आज चांगलाच होळीचा रंग चढला आहे. आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांची जबरदस्त खरेदी झाली. आयटी आणि बँकिंग शेअर्सच्या खरेदीमुळे शेअर बाजार उच्च पातळीवर बंद झाला. आजच्या व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 451 अंकांच्या वाढीसह 60,266 वर बंद झाला. तसेच नॅशनल  राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 127 अंकांच्या उसळीसह 17,718 अंकांवर बंद झाला.

Stock Market Closing On 6th March 2023: सेक्टर इंडेक्समध्ये काय स्थिती?

आज दिवसभरातील व्यवहारात रिअल इस्टेट आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे निर्देशांक वगळता सर्वच क्षेत्रातील स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली. बँकिंग, आयटी, ऑटो, फार्मा, धातू. ऊर्जा, इन्फ्रा, मीडिया, कंझ्युमर ड्युरेबल्स, एफएमसीजी आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्स चांगल्या वाढीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 स्टॉक्सपैकी 25 स्टॉक्स वाढीसह बंद झाले. तर केवळ 5 स्टॉक्स घसरले. तर निफ्टीच्या 50 स्टॉक्सपैकी 38 स्टॉक्स वधारले तर 12 स्टॉक्स घसरणीसह बंद झाले.

इंडेक्‍स कोणत्या अंकांवर स्थिरावला दिवसातील उच्चांक दिवसातील नीचांक किती टक्के बदल
BSE Sensex 60,238.46 60,498.48 60,005.65  
BSE SmallCap 28,090.55 28,209.74 27,881.51 0.88%
India VIX 12.27 12.47 11.84 0.72%
NIFTY Midcap 100 30,960.05 31,093.95 30,825.75 0.85%
NIFTY Smallcap 100 9,442.10 9,484.65 9,386.75 1.12%
NIfty smallcap 50 4,256.65 4,272.65 4,232.55 1.19%
Nifty 100 17,506.30 17,586.05 17,467.80 0.01
Nifty 200 9,190.05 9,228.45 9,167.55 0.01
Nifty 50 17,711.45 17,799.95 17,671.95 0.0067

Stock Market Closing On 6th March 2023: ट्रेंडिंग स्टॉक

आज दिवसभरातील व्यवहारात अदानी एंटरप्रायझेस 5.50 टक्के, टाटा मोटर्स 2.83 टक्के, ओएनजीसी 2.56 टक्के, एनटीपीसी 2.43 टक्के, पॉवर ग्रिड 2.27 टक्के, इन्फोसिस 1.90 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.88 टक्के वाढीसह बंद झाले. घसरलेल्या स्टॉक्समध्ये ब्रिटानिया 2.09 टक्क्यांनी, टाटा स्टील 1.26 टक्क्यांनी, जेएसडब्ल्यू 1.18 टक्क्यांनी, हिंदाल्को 0.58 टक्क्यांनी घसरले.

Stock Market Closing On 6th March 2023: गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ 

भारतीय शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत चांगलीच झेप घेतली आहे. आजच्या व्यवहारात, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 265.49 लाख कोटी रुपये झाले आहे, तर शुक्रवारी ते 263.34 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.15 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 

दरम्यान, भारतीय शेअर बाजाराची आजची सुरुवात जबरदस्त तेजीत झाली. आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्सने 60,000 चा टप्पा ओलांडला. निफ्टीने 17680 ची पातळीही ओलांडली आहे. बँक निफ्टीने आज जोरदार सुरुवात केली आणि 41525 चा टप्पा पार केला. आज बाजाराची सुरुवात चांगल्या तेजीत झाली आहे आणि बीएसईचा 30 शेअर्स निर्देशांक उघडण्याच्या वेळी 198.07 अंक होता. बीएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 86.00 अंक होता. सेन्सेक्समधील 30 स्टॉक्सपैकी 28 शेअर वधारले आणि 2 घसरले होते.

 

महत्त्वाच्या बातम्या

TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
Embed widget