एक्स्प्लोर

Closing Bell: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; गुंतवणूकदारांचे 21 हजार कोटी बुडाले

Closing Bell Today: शेअर बाजारात आजही विक्रीचा जोर अधिक दिसून आल्याने बाजारात घसरण दिसून आली.

Share Market Closing Bell Today: अनेक मोठ्या कंपन्यांचे निकाल बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे न लागल्याने सोमवारी, 24 जुलै रोजी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 305 अंकांनी घसरून बंद झाला. तर, निफ्टी निर्देशांक (Nifty) 19,650 अंकांच्या पातळीजवळ बंद झाला. एफएमसीजी, एनर्जी, बँकिंग, ऑईल अॅण्ड गॅसच्या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. दुसरीकडे, युटिलिटीज आणि कॅपिटल गुड्जच्या शेअर दरात तेजी दिसून आली.  आजच्या व्यवहारात शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे सुमारे 21 हजार कोटी रुपये बुडाले.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (BSE) 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 299.48 अंक अर्थात 0.45 टक्क्यांनी घसरून 66,384.78 वर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी (NIFTY 50) 78.55 अंकांनी किंवा 0.40 टक्क्यांनी घसरून 19,666.45 च्या पातळीवर आला.

आजच्या व्यवहारात इंडसइंड बँक 2.01 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 1.56 टक्के, पॉवरग्रीड 1.3 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.30 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 1.14 टक्के, एशियन पेंट्स 0.74 टक्के, लार्सन 0.74 टक्के, टीसीएस 0.73 टक्के, टाटा मोटर्स 0.55 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले.  आयटीसी 3.87 टक्क्यांनी, कोटक महिंद्रा 3.80 टक्क्यांनी, टेक महिंद्रा 2.80 टक्क्यांनी, रिलायन्स 1.92 टक्क्यांनी, टाटा स्टील 1.03 टक्क्यांनी घसरले.

इंडेक्‍स  किती अंकांवर बंद दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल
BSE MidCap 29,634.85 29,763.03 29,557.59 00:04:19
BSE Sensex 66,384.78 66,808.56 66,326.25 -0.45%
BSE SmallCap 34,172.03 34,355.47 34,143.06 0.07%
India VIX 11.65 12.00 10.54 1.46%
NIFTY Midcap 100 36,742.60 36,940.85 36,705.70 -0.15%
NIFTY Smallcap 100 11,571.90 11,625.25 11,548.20 0.37%
NIfty smallcap 50 5,196.05 5,225.15 5,172.55 0.23%
Nifty 100 19,540.45 19,642.80 19,526.65 -0.32%
Nifty 200 10,344.10 10,396.85 10,336.75 -0.29%
Nifty 50 19,672.35 19,782.75 19,658.30 -0.37%

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) मध्ये आज वाढीपेक्षा तोट्याने बंद झालेल्या समभागांची संख्या जास्त आहे. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,855 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 1,775 शेअर्स वाढीसह बंद झाले. त्याच वेळी, 1,921 समभागांमध्ये घसरण झाली. तर 159 शेअर्स कोणत्याही चढ-उताराशिवाय फ्लॅट बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारात 268 समभागांनी अपर सर्किट मारले. त्याच वेळी, 274 शेअर्स त्यांच्या लोअर सर्किट मर्यादेला स्पर्श करून बंद झाले.

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर; नफ्यात 11 टक्क्यांची घट

देशातील सर्वात मोठी खाजगी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) एप्रिल ते जून या आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीचे (Quarter 1 result) निकाल जाहीर केले आहेत. पहिल्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 11 टक्क्यांनी घट झाली आहे. पहिल्या तिमाहीत रिलायन्सचा नफा (Reliance Profit) 16,011 कोटी रुपये आहे, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत निव्वळ नफा 17,955 कोटी रुपये होता.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ऑपरेशनमधून मिळणारे उत्पन्न देखील 5.3 टक्क्यांनी घसरले आहे. यंदाच्या वर्षातील तिमाहीत 2.11 लाख कोटी रुपयांचे महसूल मिळाले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत 2,23,113 कोटी रुपये इतके उत्पन्न होते. रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 9 रुपये लाभांश (Reliance Dividend) जाहीर केला आहे.

इतर संबंधित बातमी:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Hanumant Pawar : मतदार याद्यांवरून विरोधक आक्रमक, ठाकरे-काँग्रेस एकत्र
Zero Hour Gajanan Kale vs Navnath Ban : मतदारयाद्यांच्या घोळावरुन काळे-बन आमनेसामने
Zero Hour Gajanan Kale : मतदारयाद्यांच्या पडताळणीला भाजप-शिंदेंच्या सेनेचा आक्षेप का?
Zero Hour Susieben Shah : सत्याचा नाही तर सत्तेसाठी मोर्चा,सुसीबेन शाहांचा हल्लाबोल
Pawar vs Mohol: 'अध्यक्ष म्हणून मी देखील जबाबदार', ऑलिम्पिक संघटनेवरून Ajit Pawar यांना Sandeep Joshi यांचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
Rohit Arya Encounter: चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
Mumbai Powai Encounter: किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर, पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू, हल्ल्यात ज्येष्ठ महिलेसह लहान मुलगी जखमी
मोठी बातमी : किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर, पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू, हल्ल्यात ज्येष्ठ महिलेसह लहान मुलगी जखमी
Embed widget