Share Market Closing Bell: शेअर बाजारात विक्रीनंतर खरेदीचा जोर; 'या' स्टॉक्सने बाजार सावरला
Share Market Closing Bell: शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसून आल्याने सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक वधारत बंद झाले. आज सकाळी बाजारात विक्रीचा सपाटा सुरू होता.
Share Market Closing Bell: भारतीय शेअर बाजारासाठी (Indian Share Market) आजचा दिवस चांगलाच ठरला. Monthly Expiry च्या दिवशी बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली होती. मात्र, त्यानंतर बाजारात खरेदीचा ओघ वाढल्याने सेन्सेक्स (BSE Sensex) आणि निफ्टी (NSE Nifty) निर्देशांकात तेजी दिसून आली. बँकिंग (Bank Nifty) आणि आयटी सेक्टरमध्ये (Nifty IT) खरेदीचा जोर दिसून आला. आज बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 223 अंकांनी वधारत 61,133.88 अंकांवर स्थिरावला. तर, निफ्टी निर्देशांक 68.50 अंकांनी वधारत 18,191.00 अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 19 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 11 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. निफ्टी 50 निर्देशांकातील 33 शेअरमध्ये खरेदीचा उत्साह दिसला. तर, 17 कंपन्यांच्या शेअरमध्ये विक्रीचा जोर दिसून आला. बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या 3628 कंपन्यांमध्ये आज ट्रेडिंग झाली. त्यापैकी 1872 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 1607 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. 149 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.
निफ्टीमध्ये भारती एअरटेलच्या शेअर दरात 2.39 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, आयशर मोटर्समध्ये 2.38 टक्के, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2.16 टक्के, अॅक्सिस बँकेत 1.67 टक्के, टाटा स्टीलच्या शेअर दरात 1.50 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, टाटा मोटर्सचा शेअर 1.23 टक्क्यांनी घसरला. अपोलो हॉस्पिटलच्या शेअर दरात 1.21 टक्के, टायटनच्या शेअर दरात 1.05 टक्के, डीव्हीज लॅबच्या शेअर दरात 0.99 टक्क्यांची घसरण दिसून आली.
आज शेअर बाजार सावरण्याचे मोठे श्रेय बँकिंग सेक्टरला गेले. बँकिंग सेक्टरमध्ये 800 अंकांची तेजी दिसून आली. बँक निफ्टी सेक्टरमध्ये विक्रीच्या दबावामुळे घसरण दिसून आली होती. त्याशिवाय, निफ्टी ऑटो, निफ्टी ऑटो, निफ्टी मेटल्स, निफ्टी एनर्जीतच्या शेअर दरात तेजी दिसून आली. फार्मा सेक्टरमध्येही खरेदीचा उत्साह दिसून आला. आज बाजारात एफएमसीजी, मीडिया आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या सेक्टरमध्ये घसरण दिसून आली.
आठवड्यातील सुरुवातीचे दोन तेजी दिसून आलेल्या भारतीय शेअर बाजारातील (Indian Share Market) व्यवहाराची आजची सुरुवात घसरणीसह झाली. जागतिक शेअर बाजारातील घसरणीचे परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आले. भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली. अमेरिकन शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. तर, आशियाई शेअर बाजारातही विक्रीचा दबाव दिसत होता. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 282 अंकांच्या घसरणीसह 60,628 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 77 अंकांच्या घसरणीसह 18,045 अंकांवर खुला झाला.