एक्स्प्लोर

Share Market Closing Bell : शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरूच; या स्टॉक्समुळे घसरणीला लगाम

Share Market Closing Bell : भारतीय शेअर बाजारात आजही घसरण दिसून आली. नफावसुलीचा मोठा दबाब बाजारावर होता.

Share Market Closing Bell : भारतीय शेअर बाजारात विक्रीचा (Share Market) सपाटा सुरूच असल्याचे चित्र आहे. अदानी समूहाच्या लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्स बाबत हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर शेअर बाजारात सुरू झालेली घसरण थांबण्याचे चित्र दिसत नाही. नफावसुलीचा जोर दिसत असल्याने आठवड्यातील चौथ्या सत्रातही शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आज शेअर बाजारातील  व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 139 अंकाच्या घसरणीसह 59,606  अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 43 अंकांच्या घसरणीसह 17,511 अंकांवर स्थिरावला.

आयटी आणि मेटल स्टॉकमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. त्यामुळे काही प्रमाणात घसरणीला लगाम लागला. बँक आणि वित्तीय सेवांशी संबंधित शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून आला. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 13 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. तर, 17 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. निफ्टी 50 मधील 24 कंपन्यांचे शेअर दर तेजीत दिसून आले. तर, 26 कंपन्यांचे शेअर दर घसरले. बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी 1570 कंपन्यांचे शेअर्स वधारले. तर, 1776 कंपन्यांचे शेअर्स घसरले. 152 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.

आज दिवसभरातील व्यवहारात एचसीएलटेक, टीसीएस, टेकएम, टाटास्टील, विप्रो, एल अॅण्ड टी या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर,  एचडीएफसी बँक, एनटीपीसी, मारुती, एचडीएफसी, रिलायन्स, एअरटेल यांच्या शेअर दरात घसरण झाली. 

BSE Sensex 59,615.82 59,960.04 59,406.31 -0.22%
BSE SmallCap 27,632.31 27,716.17 27,417.92 0.08%
India VIX 15.08 16.01 14.52 -3.29%
NIFTY Midcap 100 30,165.65 30,257.60 29,883.50 -0.15%
NIFTY Smallcap 100 9,237.65 9,276.80 9,158.35 -0.08%
NIfty smallcap 50 4,186.45 4,194.30 4,137.90 0.40%
Nifty 100 17,286.30 17,386.30 17,224.20 -0.28%
Nifty 200 9,058.70 9,106.00 9,019.40 -0.26%
Nifty 50 17,511.25 17,620.05 17,455.40

-0.25%

या शेअर्समध्ये चढ-उतार

आज, शेअर बाजारातील व्यवहारात टाटा स्टीलमध्ये 0.67 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्याशिवाय, सन फार्मा 0.52 टक्के, मारुती सुझुकी 0.42 टक्के, टीसीएस 0.40 टक्के, एचसीएल टेक 0.38 टक्के, कोटक महिंद्रा 0.38 टक्के, टेक महिंद्रा 0.24 टक्के, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात 0.21 टक्क्यांची तेजी दिसून आली. 

एशियन पेंट्समध्ये 3.20 टक्क्यांची मोठी घसरण दिसून आली. त्याशिवाय, टायटन 1.34 टक्के, इंडसइंड बँक 1.30 टक्के, बजाज फिनसर्व 1.01 टक्के, भारती एअरटेल 0.98 टक्क्यांची घसरण दिसून आली. 

गुंतवणूकदारांना फटका

आज दिवसभरात बाजारात झालेल्या घसरणीच्या परिणामी गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे मार्केट कॅप 260.88 लाख कोटी इतके झाले. बुधवारी, 261.345 लाख कोटी इतके बाजार भांडवल होते. आज दिवसभरात गुंतवणूकदारांना 46 हजार कोटींचे नुकसान झाले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीचTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaRaj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलंCM Eknath Shinde : मी कॉमन मॅन आहे,तुम्ही सुपरमॅन बनवा , शिंदे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget