एक्स्प्लोर

Mutual Fund SIP: म्यूच्यूअल फंडमध्ये SIP द्वारे गुंतवणूक वाढली, ऑक्टोबरमध्ये गुंतवणूकदारांकडून नवं रेकॉर्ड, 25 हजार कोटींचा टप्पा ओलांडला 

Mutual Fund Monthly SIP: ऑक्टोबर महिन्यात म्यूच्यूअल फंडमध्ये एआयपीद्वारे गुंतवणुकीचं नवं रेकॉर्ड निर्माण झालं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 हजार कोटींची रक्कम वाढली आहे.  

SIP Calculator मुंबई: म्यूच्यूअल फंडमध्ये सिस्टीमॅटिक इनवेस्टमेंट प्लॅननुसार ऑक्टोबर हमहिन्यात करण्यात आलेल्या गुंतवणुकीनं जुनी रेकॉर्ड मोडली आहेत. ऑक्टोबर महिन्यात एसआयपी गुंतवणूक 25  हजार कोटींवर पोहोचली आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार एसआयपीद्वारे म्यूच्यूअल फंडसमध्ये 25,323 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये रक्कम वाढली आहे. सप्टेंबर 2024 मध्ये एसआयपीतून गुंतवणूक 24,509 कोटी रुपये झाली होती. गेल्यावर्षी म्हणजेच ऑक्टोबर 2023 मध्ये म्यूच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक 16,928 कोटी रुपये झाली होती.  

म्यूच्यूअल फंडस चालवणाऱ्या अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांची संस्था एम्फी (Asssociation of Mutual Funds in India)  नं ऑक्टोबर 2024 मधील म्यूच्यूअल फंडात आलेल्या गुंतवणुकीची माहिती जारी केली आहे. या डेटानुसार ऑक्टोबर महिन्यात इक्विटी म्यूच्यूअल फंडात इनफ्लोमध्ये 21.69 कोटी रुपयांची वाढ झाली असून तो 41887 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या 44 महिन्यांपासून इक्विटी म्यूच्यूअल फंडातील गुंतवणूक वाढत आहे. लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या तीन सेगमेंटच्या फंडमध्ये जोरदार गुंतवणूक वाढली आहे.  

एम्फीच्या आकडेवारीनुसार लार्ज-कॅप फंडमध्ये 3452 कोटी रुपये, मिड कॅप फंड्समध्ये 4883 कोटी आणि स्मॉल कॅप फंड्समध्ये 3771 कोटी रुपयांची गुंतवणूक ऑक्टोबर महिन्यात झाली. ऑक्टोबर महिन्यात हायब्रिड फंडमध्ये सर्वाधिक 16863.3 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.त्यापूर्वीच्या महिन्यात 4901 कोटी रुपये होती. सेक्टरोल आणि थीमॅटिक फंडमध्ये गुंतवणुकीत घट झाली आहे. सप्टेंबर महिन्यात त्यामध्ये 13255 कोटी रुपयांची तर ऑक्टोबर महिन्यात 12278 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.  

सर्व म्यूच्यूअल फंडची अॅसेट अंडर मॅनेजमेंट रक्कम ऑक्टोबर महिन्यात 67.25 कोटी रुपये झाली. ती सप्टेंबर 2024 मध्ये 67.09 कोटी रुपये होती.  

दरम्यान, भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात घसरणीचं चित्र पाहायला मिळालं. आठवड्यातील दोन दिवस वगळता इतर दिवसांमध्ये शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम देखील शेअर बाजारावर पाहायला मिळाला. आज शेअर बाजारात निफ्टी 50 मध्ये थोडी घसरण पाहायला मिळाली.

इतर बातम्या :

Share Market : रिलायन्स इंडस्ट्रीजला मोठं नुकसान, टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचं बाजारममूल्य घटलं, गुंतवणूकदारांचं नुकसान 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Embed widget