एक्स्प्लोर

Share Market : दलाल स्ट्रीटवर ब्लॅक मंडे, गुंतवणूकदार आडवे; शेअर बाजारात एकाच दिवसात सात लाख कोटी पाण्यात

Stock Market Crash : अमेरिकेत गेल्या 40 वर्षातील महागाईचा दर सर्वोच्च पातळीवर असल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. 

मुंबई: भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने ब्लॅक मंडे ठरला असून बाजारात आज मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. आज एकाच दिवसात गुंतवणूकदारांचं सात लाख कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. दलाल स्ट्रीटवर सेन्सेक्समध्ये आज जवळपास तीन टक्क्यांची घसरण झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांसाठी हा मोठा धक्का असल्याचं दिसून येतंय.

अमेरिकेमध्ये महागाईचा उच्चांक, भारतीय शेअर बाजारावर परिणाम
अमेरिकेला गेल्या 40 वर्षांमधील सर्वाधिक महागाईला तोंड द्यावं लागत असून त्या ठिकाणची महागाई 8.6 टक्क्यांवर पोहोचली आहे. वाढत्या महागाईला नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात वाढ होण्याची शक्यता आहे.  

फेडरल बँकेकडून व्याज दर वाढण्याची शक्यता
फेडरल रिझर्व्हकडून  14 आणि 15 जून दरम्यान बैठक होणार आहे. या बैठकीत 75 बेसिस पॉईन्टसच्या व्याज दरवाढीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या आधी 50 बेसिस पॉईन्टसच्या व्याज दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक परदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढत असून सुरक्षित ठिकाणी गुंतवण्यासाठी शेअर विक्री करत आहेत.

डॉलरच्या तुलनेत रुपयाने तळ गाठला
डॉलरच्या तुलनेत आजही रुपयाची घसरण झाली आहे. शुक्रवारच्या 77.84 रुपयाच्या तुलनेत आज रुपयाची किंमत 78.28 रुपयांवर पोहोचली आहे. रुपयाची ही आतापर्यंतची निचांक्क पातळी आहे. त्यामुळे आता एका डॉलरसाठी 78.28 रुपये मोजावे लागणार आहेत. परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री आणि अमेरिकेतील महागाई दर यामुळे एका डॉलरच्या तुलनेत रुपयांची ऐतिहासिक घसरण झाली आहे.

आरबीआयकडून रेपो दरात वाढ
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून गेल्या आठवड्यात नवीन रेपो दर जाहीर करण्यात आला. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. सध्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यावर रिझर्व्ह बँकेचे प्रमुख लक्ष्य असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे. आरबीआयच्या नव्या पतधोरणानुसार आता रेपो दर 4.90 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे कर्ज महागणार असून ईएमआयदेखील वाढणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चीनमधील एचएमपीव्ही व्हायरसची भारतात एन्ट्री झालीच! पहिली केस सापडली, आठ महिन्यांच्या चिमुरडीला लागण
चीनमधील एचएमपीव्ही व्हायरसची भारतात एन्ट्री झालीच! पहिली केस सापडली, आठ महिन्यांच्या चिमुरडीला लागण
Walmik Karad : 'खाकी' आहे खंडणीखोर, हाफ मर्डर करणाऱ्यांच्या साक्षीला! दोन शासकीय बाॅडीगार्ड ठेवणाऱ्या वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुले त्याच्या पुढचा निघाला
'खाकी' आहे खंडणीखोर, हाफ मर्डर करणाऱ्यांच्या साक्षीला! दोन शासकीय बाॅडीगार्ड ठेवणाऱ्या वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुले त्याच्या पुढचा निघाला
Suresh Dhas on Walmik Karad : 100 बँक खाती, 17 सीम कार्डचा वापर, खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठका! वाल्मिक कराडची सुरेश धसांकडून पुन्हा पोलखोल
100 बँक खाती, 17 सीम कार्डचा वापर, खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठका! वाल्मिक कराडची सुरेश धसांकडून पुन्हा पोलखोल
Walmik Karad: संतोष देशमुख प्रकरणातील एसआयटीचे प्रमुख वगळता बाकी सदस्य वाल्मिक कराडचे पोलीस; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
वाल्मिक कराडचा खास माणूस एसआयटी पथकात; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narhari Zirwal Full Speech : मी कोणताही मंत्री होऊ शकतो...मुख्यमंत्री सुद्धा, झिरवाळांचं वक्तव्यTop 90 at 9AM Superfast 06 January 2025 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 06 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सTop 80 at 08AM Superfast 06 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चीनमधील एचएमपीव्ही व्हायरसची भारतात एन्ट्री झालीच! पहिली केस सापडली, आठ महिन्यांच्या चिमुरडीला लागण
चीनमधील एचएमपीव्ही व्हायरसची भारतात एन्ट्री झालीच! पहिली केस सापडली, आठ महिन्यांच्या चिमुरडीला लागण
Walmik Karad : 'खाकी' आहे खंडणीखोर, हाफ मर्डर करणाऱ्यांच्या साक्षीला! दोन शासकीय बाॅडीगार्ड ठेवणाऱ्या वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुले त्याच्या पुढचा निघाला
'खाकी' आहे खंडणीखोर, हाफ मर्डर करणाऱ्यांच्या साक्षीला! दोन शासकीय बाॅडीगार्ड ठेवणाऱ्या वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुले त्याच्या पुढचा निघाला
Suresh Dhas on Walmik Karad : 100 बँक खाती, 17 सीम कार्डचा वापर, खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठका! वाल्मिक कराडची सुरेश धसांकडून पुन्हा पोलखोल
100 बँक खाती, 17 सीम कार्डचा वापर, खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठका! वाल्मिक कराडची सुरेश धसांकडून पुन्हा पोलखोल
Walmik Karad: संतोष देशमुख प्रकरणातील एसआयटीचे प्रमुख वगळता बाकी सदस्य वाल्मिक कराडचे पोलीस; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
वाल्मिक कराडचा खास माणूस एसआयटी पथकात; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Ind vs Eng T20 Series : टीम इंडिया होणार मोठी उलथापालथ! इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी BCCI 'या' खेळाडूंना देणार संधी? जाणून घ्या शेड्यूल अन् सर्वकाही
टीम इंडिया होणार मोठी उलथापालथ! इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी BCCI 'या' खेळाडूंना देणार संधी? जाणून घ्या शेड्यूल अन् सर्वकाही
Mumbai High Court : मुलीला एकदा फॉलो करणे गुन्हा नाही; सतत पाठलाग करणे हा कायदेशीर गुन्हा! उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षा केली कमी
मुलीला एकदा फॉलो करणे गुन्हा नाही; सतत पाठलाग करणे हा कायदेशीर गुन्हा! उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षा केली कमी
Ladki Bahin Yojana: खटाखट नोंदणी वाढवण्यासाठी भाजपचा नवीन फंडा, 2100 रुपये देतो सांगून पक्ष सदस्यत्त्वाचे फॉर्म फरुन घेतले
लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देतो सांगून भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष सदस्यत्त्वाचे फॉर्म भरुन घेतले
Pushpa 2 Box Office: 'पुष्पा 2'नं किती कोटींचा गल्ला जमवला? 800 की, 1200 कोटी? बॉक्स ऑफिसच्या आकड्यांचं गूढ तुम्हाला उलगडलं?
'पुष्पा 2'नं किती कोटींचा गल्ला जमवला? 800 की, 1200 कोटी? बॉक्स ऑफिसच्या आकड्यांचं गूढ तुम्हाला उलगडलं?
Embed widget