एक्स्प्लोर

Share Market : शेअर बाजार घसरला..., Nifty 15,800 वर तर Sensex 1456 अंकांनी घसरला

Stock Market : बँक, आयटी, मेटल, रिअॅलिटीसह सर्वच क्षेत्रातले शेअर्स घसरले.

मुंबई: शेअर बाजारासाठी आजचा काळा दिवस असल्याचं स्पष्ट झालं आहे. शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांचे सात लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1,456 अंकांनी घसरला तर निफ्टीही 427 अंकांनी घसरला.

अमेरीकेतील महागाईचे परिणाम शुक्रवारी वॉल स्ट्रीटवर बघायला मिळाले होते. त्यात फेडकडून येणाऱ्या बैठकीत व्याजदर 0.75 टक्क्यांनी वाढविण्याचा विचार असल्यानं त्याचा दबाव जगभरातील बाजारांवर दिसतोय. बाजारातील लिक्विडिटी कमी झाली तर त्याचा फटका शेअर बाजारांना बसत असतो आणि हाच फटका भारतीय शेअर बाजाराला बसलाय. मोठ्या प्रमाणात समभागांची विक्री बघायला मिळाली आहे. 

सेन्सेक्समध्ये आज 2.68 टक्क्यांची घसरण झाली असून तो 52,864 स्थिरावला. निफ्टीमध्ये 2.64 टक्क्यांची घसरण होऊन तो 15,774 अंकांवर स्थिरावला.

आज शेअर बाजार बंद होताना 650 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर 2759 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. 117 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. 

आज शेअर बाजार बंद होताना Bajaj Finserv, Bajaj Finance, Tech Mahindra, IndusInd Bank आणि Hindalco Industries कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर Nestle India आणि Bajaj Auto या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

बीएसई मिडकॅपमध्ये 2.7 टक्क्यांचा तर स्मॉलकॅपमध्ये 3 टक्क्यांची घट झाली आहे. 

रुपयाने तळ गाठला
डॉलरच्या तुलनेत आजही रुपयाची घसरण झाली आहे. शुक्रवारच्या 77.84 रुपयाच्या तुलनेत आज रुपयाची किंमत 78.28 रुपयांवर पोहोचली आहे. रुपयाची ही आतापर्यंतची निचांक्क पातळी आहे. 

आज शेअर बाजार बंद होताना सार्वजनिक बँका, खासगी बँका, आयटी, रिअॅलिटी, कॅपिटल गुड्स, ऑटो, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 2 ते 4 टक्क्यांची घसरण झाली आहे. 

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ

  • Nestle- 0.47 टक्के
  • Bajaj Auto- 0.01 टक्के

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण

  • Bajaj Finserv- 7.08 टक्के
  • Bajaj Finance- 5.46 टक्के
  • IndusInd Bank- 5.23 टक्के
  • Tech Mahindra- 5.22 टक्के
  • Hindalco- 5.00 टक्के

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Nana Patole: शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony :Maharashtra Superfast News :महायुती सरकारचा शपथविधी : 05 Dec 2024 :ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : सकाळी 8 च्या हेडलाईन्स एबीपी माझा : 05 Dec 2024 : ABP MajhaMahayuti Oath Ceremony : शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?सरकारमध्ये सामील व्हावं,आमदारांचा आग्रहTop 70 News : सकाळी 7  च्या 70 महत्वाच्या बातम्यांचा आढावा : 05 DEC 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Nana Patole: शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
Mahayuti Oath Taking Ceremony: पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Embed widget