Sensodyne Naaptol Ads: नापतोल, सेन्सोडाइनच्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या, ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून नोटीस
CCPA ने नापतोल कंपनीला 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे,
Sensodyne Naaptol Ads : भारतातील खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई करण्यासाठी, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ने GlaxoSmithKline (GSK) कंझ्युमर हेल्थकेअर लिमिटेड, Sensodyne उत्पादनांचे निर्माते आणि नापतोल ऑनलाईन शॉपिंग लिमिटेड Naaptol Online Shopping Ltd यांना जाहिराती बंद करण्यास सांगितले आहे. कारण त्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या असून ग्राहकांच्या दिशाभूल करणाऱ्या आहेत असे म्हटले आहे. CCPA ने नापतोल कंपनीला 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने दिली आहे.
आदेशामागील कारण
CCPA ने 27 जानेवारी रोजी GlaxoSmithKline (GSK) कंझ्युमर हेल्थकेअर लिमिटेड विरुद्ध या प्रकरणाची चौकशी करत दखल घेत आदेश जारी केला, असे PTI अहवालात म्हटले आहे. प्राधिकरणाने GSK ला ऑर्डर दिल्यापासून सात दिवसांच्या आत देशातील Sensodyne उत्पादनांच्या सर्व जाहिराती बंद करण्यास सांगितले, हे जाहिरातींच्या नियमांचे उल्लंघन आहे. कारण त्यांनी प्रॉडक्टला दंतचिकित्सक उत्पादनांची मान्यता देताना भारताबाहेर प्रॅक्टिस करत असल्याचे दाखवले आहे. भारतातील दंतचिकित्सकांना कोणत्याही उत्पादनाची किंवा औषधाची सार्वजनिकरित्या मान्यता देण्याची परवानगी नाही, CCPA ने म्हटलंय की, GSK कंझ्युमर हेल्थकेअर "भारतातील कायद्याचे उल्लंघन करत आहे, ज्यासाठी परवानगी दिली जाऊ शकत नाही. तसेच विदेशी दंतवैद्यांनी सांगितलेल्या संवेदनशीलतेबद्दल ग्राहकांमध्ये भीती निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. "म्हणून, भारतातील सेन्सोडाइन उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये भारताबाहेर प्रॅक्टिस करणाऱ्या दंतवैद्यांकडून समर्थन दर्शवल्या जातात. त्या ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या कलम 2 (28) नुसार दिशाभूल करणाऱ्या जाहिराती' म्हणून पात्र ठरतात असे या आदेशात म्हटले आहे. CCPA ने कंपनीच्या यांना 15 दिवसांच्या आत विविध दाव्यांवर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार. यावर GSK कंझ्युमर हेल्थकेअरच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले की, "जगभरातील दंतवैद्यांनी शिफारस केलेले", "जगातील प्रथम क्रमांकाची संवेदनशील टूथपेस्ट", "वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध केलेले कन्फर्ट, 60 सेकंदात कार्य करते" या दाव्यांच्या समर्थनार्थ कंपनीने कागदपत्रे सादर केली. ज्यामध्ये म्हटलंय, CCPA कडून ऑर्डर मिळाल्याची पुष्टी करतो. आम्ही त्याचा तपशीलवार विचार करत असून हे स्पष्ट करू इच्छितो की, आमचे प्रॉडक्ट हे जाहीरातींवरील कायदे आणि उद्योग मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतात. आम्ही एक जबाबदार आणि अनुपालन करणारी कंपनी आहोत, जी आपल्या ग्राहकांसाठी वचनबद्ध आहे,”
Naaptol विरुद्ध ऑर्डर
CCPA ने दिशाभूल करणार्या जाहिराती आणि अनुचित व्यापार पद्धतींबद्दल Naaptol Online Shopping Ltd विरुद्ध आदेश दिला आहे केला आणि 10 लाख रुपयांचा दंड भरण्यास सांगितले.
ग्राहक संरक्षण नियामकाने यावर्षी 2 फेब्रुवारीला Naaptol विरुद्ध आदेश जारी केला, असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे. CCPA ने Naaptol Online Shopping Ltd विरुद्ध आणकी एक आदेश पारित केला. ज्यामध्ये कंपनीला “2 सोन्याच्या दागिन्यांचा सेट”, “मॅग्नेटिक नी सपोर्ट”आणि “एक्युप्रेशर योग चप्पल” च्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती बंद करण्यास सांगितले. CCPA ने Naaptol वर 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. कारण कंपनी 24X7 चॅनेल चालवते आणि देशभरात विविध भाषांमध्ये दररोज प्रसारित केली जात असल्याने त्यांच्या दिशाभूल करणार्या जाहिरातींचा असंख्य ग्राहकांवर दूरगामी परिणाम झाला आहे.
Naaptol ची जाहीरात एक रेकॉर्ड केलेला भाग आहे असे आदेशात म्हटले आहे. ती ताबडतोब बंद करण्यास सांगून, CCA ने उत्पादनांची "कृत्रिम टंचाई" निर्माण करणार्या त्यांच्या पद्धतींकडे लक्ष वेधले, ज्यामध्ये फक्त आजच उपलब्ध असलेले उत्पादन पुढील 30 दिवसांच्या आत विक्रीसाठी असेल. कंपनीने प्रमोशन चालवणाऱ्या त्यांच्या चॅनल किंवा प्लॅटफॉर्मवर स्पष्टपणे दाखवावे लागेल की हा पूर्व-रेकॉर्ड केलेला भाग आहे. CCPA ने Naaptol ला मे 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान दाखल केलेल्या तक्रारींचे निराकरण करण्याचे आणि 15 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. नॅशनल कंझ्युमर हेल्पलाइन डेटा दर्शवितो की या वर्षी जून 2021 ते 25 जानेवारी या कालावधीत Naaptol विरोधात 399 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.