(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Closing Bell: आयटी आणि FMCG मधील तेजीने बाजारात हिरवळ; सेन्सेक्स वधारला
Share Market Closing Bell: आज गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या खरेदीच्या उत्साहामुळे बाजारात तेजी दिसून आली.
Share Market Closing Bell: भारतीय शेअर बाजारासाठी बुधवारचा ट्रेडिंगचा दिवस चांगला सकारात्मक राहिला. नव्या आर्थिक वर्षातील दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर कायम राहिला. या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 582 अंकांच्या तेजीसह 59,689 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 160 अंकांच्या तेजीसह 17,557 अंकांवर बंद झाला. उद्या आरबीआयचे पतधोरण जाहीर होणार आहे. त्याचा बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
आजच्या दिवसभराच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, फार्मा, एफएमसीजी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर एनर्जी, ऑटो, सेक्टर शेअर्समध्ये नफावसुली दिसून आली. आजच्या व्यवहारात स्मॉलकॅप सेक्टर तेजीसह बंद झाला आहे. मिडकॅप सेक्टर घसरणीसह बंद झाला. निफ्टी 50 कंपन्यांपैकी 38 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर 12 कंपन्यांचे शेअर दर घसरले. सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 21 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह आणि 9 शेअर्स घसरणीसह बंद झाले.
इंडेक्स | किती अंकांवर बंद | दिवसभरातील उच्चांक | दिवसभरातील नीचांक | किती टक्के बदल |
BSE Sensex | 59,725.87 | 59,747.12 | 59,094.40 | 0.01 |
BSE SmallCap | 27,529.40 | 27,553.79 | 27,263.62 | 0.01 |
India VIX | 12.41 | 12.81 | 12.05 | -1.37% |
NIFTY Midcap 100 | 30,160.15 | 30,197.00 | 30,074.25 | -0.02% |
NIFTY Smallcap 100 | 9,126.85 | 9,136.95 | 9,074.95 | 0.01 |
NIfty smallcap 50 | 4,144.25 | 4,149.10 | 4,114.70 | 0.00 |
Nifty 100 | 17,373.95 | 17,387.80 | 17,232.65 | 0.01 |
Nifty 200 | 9,098.35 | 9,104.85 | 9,034.50 | 0.01 |
Nifty 50 | 17,557.05 | 17,570.55 | 17,402.70 | 0.01 |
या शेअरमध्ये दिसून आली तेजी
आज दिवसभरातील व्यवहारात लार्सनच्या शेअर दरात 3.96 टक्क्यांची तेजी दिसून आली. एचडीएफसीमध्ये 2.97 टक्के, एचडीएफसी बँक 2.72 टक्के, आयटीसीच्या शेअर दरात 1.93 टक्के, सन फार्मामध्ये 1.93 टक्के, एचयूएलमध्ये 1.78 टक्के, टायटनमध्ये 1.39 टक्के, टीसीएसमध्ये 1.17 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, महिंद्राच्या शेअर दरात 1.29 टक्क्यांची घसरण दिसून आली. इंडसइंड बँकेत 1.26 टक्के, एनटीपीसीच्या शेअर दरात 1.01 टक्के, एसबीआयच्या शेअर दरात 0.73 टक्के, मारुती सुझुकीच्या शेअर दरात 0.59 टक्क्यांची घसरण दिसून आली.
गुंतवणूकदारांची दिवाळी!
आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत चांगली वाढ झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपनीचे बाजार भांडवल 261.31 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सोमवारी बाजार भांडवल 259.63 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.68 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.