एक्स्प्लोर

Closing Bell : शेअर बाजारात ब्लड बाथ; सेन्सेक्स, निफ्टीत घसरण, गुंतवणुकदारांचे 3 लाख कोटी बुडाले

Share Market Closing Bell : शेअर बाजारात झालेल्या घसरणीच्या परिणामी गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला.

मुंबई : आठवड्यातील सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात (Share Market) विक्रीचा जोर दिसून आला. शेअर बाजारात झालेल्या घसरणीच्या परिणामी गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला. आजच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 901 अंकांनी घसरत 63 हजार 148 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 265 अंकांनी घसरून 18, 857 अंकांवर बंद झाला. बाजारात आलेल्या घसरणीच्या लाटेत गुंतवणुकदारांचे 3 लाख कोटी बुडाले आहेत. 

अमेरीकन बॉण्ड यील्डमुळे व्याजदरात अधिक काळ चढेच राहणार असल्याने गुंतवणूकदार चिंतेत आहेत. आशियाई बाजारातील पडझडीचे भारतीय शेअर बाजारावर परिणाम दिसून येत आहेत. भारतीय शेअर बाजारात मागील सहा सत्रापासून घसरण सुरू आहे. मागील सात महिन्यातील भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी घसरण आहे.

कोणत्या सेक्टर चढ-उतार?

आजच्या व्यवहारात बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये नफा वसुलीचा जोर दिसून आला. त्यामुळे निफ्टी बँक 552 अंकांच्या किंवा 1.29 टक्क्यांच्या घसरणीसह 42,280 अंकांवर बंद झाला. याशिवाय ऑटो, आयटी, फार्मा, एफएसीजी, मेटल, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. मिड कॅप आणि स्मॉल स्टॉक्समधील घसरणीचा कल आजही कायम राहिला. मिड कॅप निर्देशांक 1.16 टक्क्यांनी किंवा 448 अंकांनी घसरून 38,116 अंकांवर बंद झाला, तर स्मॉल कॅप निर्देशांक 42 अंकांनी घसरून 12,930 अंकांवर बंद झाला.

इंडेक्‍स किती अंकांवर बंद दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल
BSE Sensex 63,148.15 63,774.16 63,092.98 -1.41%
BSE SmallCap 36,205.34 36,262.79 35,271.13 -0.32%
India VIX 11.73 12.70 11.31 3.69%
NIFTY Midcap 100 38,116.75 38,365.80 37,655.85 -1.16%
NIFTY Smallcap 100 12,390.70 12,421.65 12,048.75 -0.34%
NIfty smallcap 50 5,692.95 5,710.80 5,557.55 -0.61%
Nifty 100 18,780.60 18,954.55 18,743.30 -1.33%
Nifty 200 10,052.50 10,141.25 10,017.55 -1.31%
Nifty 50 18,857.25 19,041.70 18,837.85 -1.39%

गुंतवणूकदारांना 3 लाख कोटींचा फटका

बाजारातील जोरदार घसरणीमुळे आज गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. एक ट्रेडिंग दिवस आधी म्हणजे 25 ऑक्टोबर 2023 रोजी, BSE वर सूचीबद्ध सर्व समभागांची एकूण मार्केट कॅप 309.22 लाख कोटी रुपये होती. आज म्हणजेच 26 ऑक्टोबर 2023 रोजी तो 306.21 लाख कोटी रुपयांवर घसरला आहे. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात 3.01 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

2335 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण

मुंबई शेअर बाजारावर उपलब्ध असलेल्या तपशीलानुसार, आज 3800 सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सचे व्यवहार झाले. त्यापैकी 1330 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.  तर, 2335 कंपन्यंच्या शेअर दरात घसरण झाली.143 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. आजच्या व्यवहारात 78 समभागांनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला.  तर, 104 कंपन्यांच्या शेअर्सने 52 आठवड्यांचा नीचांक गाठला. आज एकाही कंपनीच्या शेअर दराला अप्पर सर्किट लागले नाही. तर, चार कंपन्यांच्या शेअर दराल लोअर सर्किट लागले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ice Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP MajhaManoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Kolhapur Viral Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Embed widget