एक्स्प्लोर

SEBI : एका तक्रारीनं 15 लाख कोटींचा अपहार उघड, सेबीचा राजेश एक्सपोर्टसला दणका,सर्वात मोठ्या सोन्याच्या रिफायनरीचा मालक संकटात, शेअर बाजारात ट्रेडिंगला बंदी

SEBI : सेबीनं राजेश एक्सपोर्टसला आर्थिक वर्ष 2021-25 या दरम्यानच्या आर्थिक वर्षात 15.15 लाख कोटींच्या अपहारासंदर्भात दणका दिला आहे 

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी ज्वेलरी आणि सोन्याची रिफायनिंग करणारी कंपनी राजेश एक्सपोर्टसला सेबीनं दणका दिला आहे. सेबीनं या कंपनीवर आर्थिक आकडेवारी चुकीच्या पद्धतीनं सादर केल्याचा आरोप केला आहे. सेबीच्या अंतरिम अहवालानुसार आर्थिक आकडेवारी  चुकीच्या पद्धतीनं सादर करण्यात आली आहे.  राजेश एक्सपोर्टसनं गेल्या पाच आर्थिक वर्षात 15.15 लाख कोटींचा महसूल चुकीच्या पद्धतीनं सादर केला होता. या कंपनीची उपकंपनी च्या उत्पन्नाच्या जवळपास 99.8 टक्के आहे. 
 
मार्च 2024 मध्ये एका शेअरधारकानं व्यापारी देण्यांसदर्भात तक्रार केली होती. तक्रार मिळाल्यानंतर सेबीनं विस्तृत चौकशी सुरु केली होती. त्यामध्ये राजेश एक्सपोर्टसच्या आर्थिक पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. 

राजेश मेहतांना राजेश एक्सपोर्टसमध्ये ट्रेडिंगला बंदी

सेबीनं तपासणीदरम्यान स्वित्झरलँड येथील राजेश एक्सपोर्टसची सहायक कंपनी वाल्कैम्बी एसए संदर्भात चौकशी सुरु केली. कारण राजेश एक्सपोर्टसकडून ती कंपनी प्रमुख ऑपरेशन सेंटर म्हणून दाखवण्यात आली होती. कंपनीच्या रिपोर्टनुसार कन्सोलिडेटेड  उत्पन्नापैकी 97 ते 99 टक्के भाग विदेशी सहायक कंपन्यांकडून मिळत होतं. मात्र सेबीनं वाल्कैम्बी एसएच्या स्वतंत्र लेखापरिक्षण खाती आणि राजेश एक्सपोर्टसच्या कन्सोलिडेटेड आकडेवारीत तफावत आढळून आली होती. 

मिंटच्या रिपोर्टनुसार वाल्कैम्बी एसएचं प्रत्यक्ष उत्पन्न कंपनीनं दाखवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी होतं. यामुळं इतर उत्पन्न कोणत्या मार्गानं आला हा प्रश्न उपस्थित आला. याशिवाय सेबीनं केलेल्या आरोपानुसार राजेश एक्सपोर्टसनं विक्री, खरेदी, स्टॉक या संदर्भात इतर सविस्तर माहिती दिली उपलब्ध करुन दिली नाही. 

राजेश एक्सपोर्टसनं यासाठी स्विस डेटा सुरक्षा कायदा आणि गोपनीय करारांचा दाखला दिला होता. मात्र, सेबीनं हा दावा फेटाळला होता. भारतीय शेअर बाजारात लिस्ट असलेल्या कोणत्याही कंपनीला भारतीय कायद्यानुसार माहिती द्यावी लागेल, विदेशी गोपनीय कायद्यांची पळवाट चालणार नाही, असं सेबीनं म्हटलं होतं. 

कंपनीनं दाखल केलेल्या काही कागदपत्रांमध्ये विरोधाभास आढळून आला आहे. एकाच फायलिंगमध्ये ग्राहकांची विक्रीची आकडेवारी वेगवेगळी सांगण्यात आली. काही ग्राहक एका रिपोर्टमध्ये दाखवण्यात आले तर दुसऱ्या रिपोर्टमध्ये ते गायब होते.  यामुळं कंपनीनं उपलब्ध करुन दिलेल्या माहितीच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 

सेबीनं राजेश एक्सपोर्टसचे प्रमुख राजेश मेहता यांना चौकशीत पूर्ण सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. राजेश मेहता यांना पुढील आदेशापर्यंत राजेश एक्सपोर्टसच्या शेअरमध्ये ट्रेडिंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे. चौकशीत आरोप सिद्ध झाले तर भारताच्या कॉर्पोरेट इतिहासात लेखापरिक्षण वादातील सर्वात मोठं प्रकरण असून शकतं. याघटनेनंतर गुंतवणूकदारांची चिंता वाढली असून आता सेबीच्या अंतिम अहवालाकडे त्यांचं लक्ष लागलंय.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
Advertisement

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget