एक्स्प्लोर

India GDP: भारताचा आर्थिक विकास दर घटण्याचा अंदाज; वाढत्या महागाईचा परिणाम

S&P Global Ratings: रशिया-युक्रेन युद्ध आणि वाढत्या महागाईचा परिणाम भारताच्या विकास दरावर होणार असल्याचा अंदाज S&P Global Ratings या आंतरराष्ट्रीय संस्थेने वर्तवला आहे.

S&P Global Ratings: वाढत्या महागाईचा फटका भारताच्या विकास दराला बसण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांपासून असलेल्या महागाईमुळे भारताचा आर्थिक विकास दर 7.8 टक्क्यांऐवजी 7.3 टक्के राहणार असल्याचा अंदाज एस अॅण्ड पी ग्लोबल रेटिंगने व्यक्त केला आहे.   

वाढती महागाई, दीर्घकाळ चालत असलेले रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम भारताच्या अर्थचक्रावर होत असल्याचे एस अॅण्ड पी ग्लोबल रेटिंग संस्थेने म्हटले आहे. 

महागाईचा दर अधिक काळ राहणे ही चितेंची बाब आहे असल्याचे संस्थेने म्हटले आहे. भारताच्या मध्यवर्ती बँकेने सध्या असलेल्या दरापेक्षाही अधिक दर वाढवण्याची आवश्यकता असल्याचे संस्थेने अहवालात म्हटले. मात्र, यामुळे उत्पादन आणि रोजगाराला फटका बसण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. 

S&P Global Ratings आर्थिक वर्ष 2022-23 साठी किरकोळ महागाई दर 6.9 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. रिझर्व्ह बँकेने हा किरकोळ महागाई दर 5.7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता.

डिसेंबरमध्ये भारताचा आर्थिक विकास दर 7.8 टक्के राहण्याचा अंदाज एस ॲंड पीनं वर्तवला होता. याआधी जागतिक बॅंकेने भारताचा विकास दर 8.7 टक्क्यांवरून चालू आर्थिक वर्ष 2022-23 साठी अंदाजित 8 टक्क्यांवर आणला होता.  

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेनेदेखील भारताचा अंदाजित विकास दर हा 9 टक्क्यांवरून 8.2 टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. आशियाई विकास बँकेनेदेखील भारताचा अंदाजित विकास दर 7.5 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. 

महागाईचा भडका; घाऊक महागाई दर 15.08 टक्क्यांवर 

किरकोळ महागाई दर 8 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्यानंतर एप्रिल 2022 मध्ये घाऊक महागाईनेही नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, घाऊक महागाईचा दर गेल्या महिन्यात 15.08 टक्के होता. एक वर्षापूर्वी म्हणजेच एप्रिल 2021 मध्ये घाऊक महागाईचा दर 10.74 टक्के होता. या वाढीसह घाऊक महागाई दर नऊ वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. इंधन आणि ऊर्जा घाऊक महागाई दर 34.52 टक्क्यांवरुन 38.66 टक्के तर अन्न धान्य महागाई दर 8.71 टक्क्यांवरुन 8.88 टक्के झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Embed widget