Rupee-Dollar Update : जगात तणाव, कच्च्या तेलाच्या दरात वाढ; डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला
Rupee-Dollar News : डॉलरच्या तुलनेत रुपयाने पुन्हा एकदा ऐतिहासिक घसरण नोंदवली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 83.26 रुपयांवर बंद झाला. आरबीआयच्या हस्तक्षेपाने घसरण काही प्रमाणात थांबली.
नवी दिल्ली : आजच्या सत्रात भारतीय चलन (Indian Currency) रुपया डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी पातळीवर बंद झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Price) पुन्हा 90 डॉलर प्रति बॅरलच्या वर पोहोचल्या आहेत. डॉलरच्या तुलनेत इतर आशियाई चलनांमध्येही घसरण दिसून आली. त्यानंतर भारतीय चलनातही घसरण झाल्याचे दिसून आले. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 83.27 रुपयांवर बंद झाली आहे. यापूर्वी 18 सप्टेंबर 2023 रोजी रुपया 83.26 च्या पातळीवर बंद झाला होता. आज रुपयाने विक्रमी नीचांक गाठला आहे.
'रॉयटर्स' या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे रुपयामध्ये फार मोठी घसरण दिसून येत नाही. आरबीआयकडून बाजारात डॉलरची विक्री सुरू आहे. ज्यामुळे देशांतर्गत चलन घसरण्यापासून वाचले आहे. आरबीआयने स्पॉट ट्रेडिंग सत्रात हस्तक्षेप केला तेव्हा त्याने दिवसभरात डॉलर्स विकले. चलन बाजारातील व्यवहाराच्या शेवटी, जेव्हा रुपया एका डॉलरच्या तुलनेत 83.28 च्या पातळीवर घसरला तेव्हा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आरबीआयच्या वतीने डॉलरची विक्री केली.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि चलन प्रमुख अनुज गुप्ता यांच्या मते, भारतीय चलन रुपया डॉलरच्या तुलनेत 83.50 रुपयांच्या पातळीवर घसरू शकतो. त्यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात सेंट्रल बँकेकडून डॉलरच्या पुरवठ्यामुळे रुपया मजबूत राहिला. वित्तीय तूट कमी झाल्यामुळे आणि महागाई कमी झाल्यामुळे रुपयाला आधार मिळाला. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने रुपयावर दबाव असेल. अनुज गुप्ता यांच्या मते, जर रुपयाने 83.50 ची पातळी तोडली तर तो 83.80 च्या पातळीवर जाऊ शकतो.
मात्र, आजच्या व्यवहारात इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध आणि कच्च्या तेलाच्या वाढीनंतर चलन बाजारात रुपया एका डॉलरच्या तुलनेत 3 पैशांच्या घसरणीसह 83.27 च्या पातळीवर बंद झाला.
भारत आपल्या कच्च्या तेलाच्या वापरापैकी 80 टक्के आयात करतो. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याबरोबरच रुपया कमकुवत झाल्यास आणि डॉलर वधारल्यास भारतीय ऑईल कंपन्यांना आयातीसाठी अधिक किंमत मोजावी लागणार आहे.
रुपया आणखी कमकुवत झाल्यास काय होईल?
सोने खरेदी महागणार!
भारत सोन्याच्या प्रमुख आयातदारांपैकी एक आहे. सणांचा हंगाम जवळ आला आहे. नवरात्री, धनत्रयोदशी आणि दिवाळीपर्यंत लोक सोने खरेदी करतात. डॉलरच्या मजबूतीमुळे सोन्याची आयात महाग झाली, तर देशात सोन्याच्या किमती वाढू शकतात. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात सोन्याची खरेदी करण्यासाठी खिसा अधिक रिकामा करावा लागेल.
कच्च्या तेलाची आयात महागणार आहे
भारत आपल्या कच्च्या तेलाच्या वापरापैकी 80 टक्के आयात करतो. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याबरोबरच रुपया कमकुवत झाल्यास आणि डॉलर वधारल्यास भारतीय ऑईल कंपन्यांना आयातीसाठी अधिक किंमत मोजावी लागणार आहे.