एक्स्प्लोर

रुपयाची घसरण थांबायचं नावच घेईना! डॉलरच्या तुलनेत रुपया 82.33 वर, महागाई आणखी वाढण्याची भीती

Rupee At All Time Low : डॉलरच्या तुलनेत रुपयाने आज ऐतिहासिक निच्चांकी गाठली आहे. बाजार बंद होताना रुपया 82.33 प्रति डॉलरवर बघायला मिळत आहे.

Rupee At All Time Low : भारतीय रुपयात मागील काही दिवसात ऐतिहासिक निच्चांकी दर दिवशी बघायला मिळत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाने प्रति डॉलर 80 चा आकडा गाठल्यानंतर आज 82 पार करुन गेलाय. त्यामुळे रुपयाची घसरगुंडी अशीच सुरु राहिल्यास भारताला कच्चा तेलाच्या आयातीसोबतच इतर आयातीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. 

डॉलर आणि रुपयात लागलेली शर्यत डॉलर जिंकताना दिसत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाने आज ऐतिहासिक निच्चांकी गाठली आहे. बाजार बंद होताना रुपया 82.33 प्रति डॉलरवर बघायला मिळत आहे. जो आतापर्यंतचा सर्वाधिक खालचा स्तर आहे. फेडरल रिझर्व्ह बँकेनं व्याजदरवाढीच्या निर्णयानंतर भारतासोबतच अनेक चलनांनी गटांगळ्या खायला सुरुवात केली आहे. जो एक मोठा चिंतेचा विषय आहे. ज्यामुळे आयातीवर मोठा परिणाम बघायला मिळू शकतो. भारताचा रुपया सावरण्यासाठी आरबीआयनं पतधोरण जाहीर करत रेपो रेट वाढवला होता. डॉलरच्या तुलनेत रुपया त्यानंतर स्थिर राहिल अशी अपेक्षा होती. मात्र तसं काही चित्र अद्याप दिसत नाही. 2022 सालात रुपयात 10 टक्क्यांहून अधिकची घसरण बघायला मिळते आहे. दुसरीकडे, हे आकडे आणखी वाढण्याची भीती आहे. 

रुपयाच्या अवमूल्यनाचे काय परिणाम?
कच्चा तेलाच्या आयातीला रुपयाच्या अवमूल्यनाचा सर्वात आधी फटका बसेल.  कच्चा तेलासाठी अधिक डॉलर मोजावे लागतील, ज्याचा थेट परिणाम भारताच्या फॉरेक्स इंडेक्स रिझर्व्हवर बघायला मिळेल. रुपयाचे अवमूल्यन वाढल्याने तेलाच्या बिलात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ज्याचा परिणाम थेट महागाई वाढीवर दिसणार आहे. खाद्य तेल आणि डाळींच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे इंधन आणि गॅसच्या किंमतीत  पुन्हा वाढ होऊ शकते. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गॅझेट, टीव्ही, मोबाईल, एसी, फ्रिजसारख्या वस्तू महागण्याची शक्यता आहे. परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक भुर्दंड बसेल. परदेशातून येणारी औषधे, वैद्यकीय उपकरणे महाग होण्याची शक्यता आहे. परदेशी पर्यटनाचा खर्च देखील महागेल.   परदेशी जात वैद्यकीय उपचार घेणाऱ्यांना देखील जादा पैसे खर्च करावे लागतील.  

दरम्यान, जागतिक बाजारात मंदीचे सावट आहे. दुसरीकडे, भारताला देखील त्याची झळ बसण्याची शक्यता आहे. कोव्हिडच्या परिस्थितीतून भारत सावरला होता. अशात युक्रेन-रशिया युद्ध आणि व्याजदरवाढीच्या मारामुळे महागाईचा भस्मासूर बघायला मिळतोय. अशात रुपया आणखी किती खाली घसरणार आणि केंद्र यासंदर्भात काय पाऊलं उचलतं हे बघणं महत्त्वाचे असेल.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरीNagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 05 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Vasant More: तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची प्रचंड धावपळ; नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय, म्हणाले...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची प्रचंड धावपळ; नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय, म्हणाले...
Embed widget