Reliance Foundation Vantara : रिलायन्सकडून देशाला 'वनतारा'ची भेट, प्राणी संवर्धनामध्ये बजावणार मोठी भूमिका
Anant Ambani : मुकेश अंबानी-नीता अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी वनतारा कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. याअंतर्गत प्राण्यांना जंगलासारखे वातावरण, उपचार आणि उत्तम खाण्यापिण्याची सेवा मिळणार आहे.
Reliance Foundation Vantara : रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या (Reliance Foundation) वतीने वनतारा हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. वनतारा कार्यक्रम (Star of the Forest) हा अनंत अंबानींचा उपक्रम आहे. जंगली जनावरांची सुटका करणे, त्यांचे पुनर्वसन आणि उपचार करणे यासाठी याची सुरुवात करण्यात आली आहे. वनतारा कार्यक्रम केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये कार्यरत आहे. हे जामनगरमधील रिलायन्सच्या रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या 3,000 एकरच्या हरित पट्ट्यात निर्मित करण्यात आलं आहे. या हरित पट्ट्यात जंगलाप्रमाणे निर्मिती करण्यात आली आहे, जेणेकरून त्या ठिकाणच्या प्राण्यांना त्या प्रकारचं वातावरण उपलब्ध होऊ शकेल.
आरोग्यसेवा, रुग्णालय, संशोधन आणि शैक्षणिक केंद्र
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या संचालक मंडळाचे संचालक अनंत अंबानी म्हणाले की, वनतारा कार्यक्रमांतर्गत आम्ही प्राण्यांसाठी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा, रुग्णालय, संशोधन आणि शैक्षणिक केंद्र उघडले आहे. या कार्यक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय विद्यापीठे आणि संस्थांशीही करार करण्यात आला आहे. जामनगर कॉम्प्लेक्समध्ये अक्षय ऊर्जेला चालना देऊन, रिलायन्सने 2035 पर्यंत निव्वळ कार्बन झीरो कंपनी बनण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. वनतारा कार्यक्रमांतर्गत गेल्या काही वर्षांत 200 हून अधिक हत्ती, प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी वाचवण्यात आले आहेत. आता या कार्यक्रमांतर्गत गेंडे, बिबट्या आणि मगरींना वाचवण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. वनताराकडून मेक्सिको आणि व्हेनेझुएलामध्येही बचाव मोहीम राबवली जात आहे.
बालपणीच्या आवडीला पॅशन बनवले
अनंत अंबानी म्हणाले की, ही माझी लहानपणापासूनची आवड होती आणि आता ती एक मिशन बनली आहे. धोकादायक परिस्थितीत पोहोचलेल्या प्राण्यांना वाचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. वनतारा कार्यक्रमांतर्गत अशा प्राण्यांना राहण्यासाठी चांगली जागा उपलब्ध करून द्यायची आहे. भारतासह जगभरातील अनेक वन्यजीव आणि वैद्यकीय तज्ज्ञ या कार्यक्रमात सामील झाल्याचा आम्हाला आनंद आहे. आम्हाला जू अथॉरिटी ऑफ इंडियासोबतही करार करायचा आहे. अनंत अंबानी या प्राणी सेवेला देवाची आणि मानवतेची सेवा असं मानलं आहे. वनतारा कार्यक्रमात शैक्षणिक संस्थांशी हातमिळवणी करून वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगितले जाईल. आज वनतारामध्ये 200 हत्ती, 300 बिबट्या, वाघ, सिंह आणि जग्वार आहेत. शिवाय 300 हरणे आणि 1200 हून अधिक मगरी, साप आणि कासवे आहेत.
देशांतर्गत आणि परदेशी संस्थांसोबत काम
वनतारा कार्यक्रमाने व्हेनेझुएलाच्या नॅशनल फाऊंडेशन ऑफ झू आणि स्मिथसोनियन अँड वर्ल्ड असोसिएशन ऑफ झू अँड एक्वैरियम यांच्या सहकार्याने सुरुवात केली आहे. भारतात
नॅशनल झुलॉजिकल पार्क, आसाम स्टेट झू, नागालँड झुलॉजिकल पार्क आणि सरदार पटेल झुलॉजिकल पार्क या संस्थांसोबत करार करण्यात आला आहे.
हत्ती केंद्र
3000 एकरमध्ये पसरलेल्या वनतारामध्ये अत्याधुनिक एलिफंट सेंटर देखील असेल. हत्तींच्या सांधेदुखीवर उपचार करण्यासाठी त्यात हायड्रोथेरपी पूल, वॉटर बॉडी आणि जकूझीदेखील असेल. येथे 500 लोकांची प्रशिक्षित कर्मचारी टीम हत्तींची काळजी घेणार आहे. 25 हजार स्क्वेअर फुटांचे हॉस्पिटलही असेल. यामध्ये सर्व प्रकारची आधुनिक उपकरणे असतील. येथे हत्तींवर शस्त्रक्रियाही करता येते. एलिफंट सेंटरमध्ये 14 हजार स्क्वेअर फुटांचे स्वयंपाकघरही असेल. केंद्रात आयुर्वेदाचाही वापर केला जाईल.
बचाव आणि पुनर्वसन केंद्र
वनतारा कार्यक्रमांतर्गत 650 एकरमध्ये एक बचाव आणि पुनर्वसन केंद्र देखील आहे. या केंद्राने सुमारे 200 जखमी बिबट्यांची सुटका केली आहे. याशिवाय 1000 हून अधिक मगरींनाही वाचवण्यात यश आले आहे. आफ्रिका, स्लोव्हाकिया आणि मेक्सिकोमधून त्यांची सुटका करण्यात आली आहे. सर्कस आणि प्राणीसंग्रहालयातून आणलेले प्राणी त्यात ठेवण्यात येणार आहेत. या केंद्रात 2100 हून अधिक कर्मचारी आहेत. या केंद्रात 1 लाख चौरस फुटाचे रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन रुग्णालय देखील आहे. त्यात अशा 7 प्रजाती आहेत, ज्या धोक्याच्या चिन्हावर स्थितीत आहेत.
रिलायन्स फाउंडेशन काय आहे?
रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्षा नीता अंबानी या आहेत. ही संस्था ग्रामीण भागाचा विकास, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन, महिला विकास, कला आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी कार्य करते. संस्थेने आतापर्यंत 55,400 गावांतील 72 लाख लोकांच्या उन्नतीसाठी काम केले आहे.