एक्स्प्लोर

PayTm Bank Latest Updates : पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवानाही रद्द होणार? आरबीआयच्या कारवाईबाबत मोठी अपडेट

PayTm Bank Latest Updates : आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर निर्बंध घातल्यानंतर एकच खळबळ उडाली . आता आरबीआय पुढील महिन्यात आणखी मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे.

PayTm Bank Latest Updates :  भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) पेटीएम कंपनीच्या (PayTm) पेटीएम पेमेंट्स बँकेवर निर्बंध घातल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकेचे काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे आता पेटीएम पेमेंट्स बँकेबाबत (Paytm Payments Banks) एक मोठी अपडेट्स समोर आली आहे. आरबीआय आता पेटीएम पेमेंट्स बँकेचा ऑपरेटिंग परवाना रद्द करण्याचा विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

'ब्लूमबर्ग'या वृत्तसंस्थेने या प्रकरणाशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. बँकिंग नियामकाने आधीच पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ठेवी स्वीकारण्यास, निधी हस्तांतरित करण्यास आणि कर्ज देण्यास प्रतिबंध केला आहे. यामुळे बँकेच्या बहुतांश सेवांवर बंदी घातली आहे. ऑपरेटिंग परवाना रद्द करण्याचा निर्णय पुढील महिन्याच्या सुरुवातीला घेतला जाऊ शकतो. बँकेला 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत सर्व व्यवहार थांबवण्यास सांगण्यात आले आहे. रिझर्व्ह  बँकेकडे उर्वरित दायित्वे कशी निकाली काढतील याचा तपशीलवार प्रस्ताव सादर करावा लागेल. यानंतर कामकाज परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.

पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड प्रतिबंधित बँक म्हणून काम करते. ही बँक ठेवी घेऊ शकते पण कर्ज देऊ शकत नाही. अब्जाधीश विजय शेखर शर्मा यांची बँकेत 51 टक्के भागीदारी आहे. पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडकडे उर्वरित भागभांडवल आहे. 

आतापर्यंत काय झाले?

नोव्हेंबर 2022: आरबीआयने काही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पेटीएम पेमेंट्स बँकेवर दंड ठोठावला होता. यामध्ये डेटाचा गैरवापर आणि ग्राहकांची अपुरी पडताळणी यांचा समावेश आहे.

मार्च 2023: आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली.

फेब्रुवारी 2024: रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ठेवी स्वीकारणे, निधी हस्तांतरित करणे आणि कर्ज देणे थांबवले. बँकेच्या बहुतांश सेवांवर बंदी घालण्यात आली. 

सिस्टिम ऑडिट रिपोर्ट आणि त्यानंतरच्या काही रिपोर्टमध्ये कंपनीने सातत्याने आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याची बाब समोर आली. त्यानंतर आरबीआयने निर्बंध घातले.त्याशिवाय, पेटीएम बँकेशी संबंधित आणखी काही गंभीर बाबी समोर आल्या असून भविष्यात आणखी आवश्यक कारवाई करण्यात येणार असल्याचे सूतोवाचही आरबीआयने केले होते. 

पेटीएम अॅप सुरू राहणार, सीईओ विजय शर्मा यांनी काय म्हटले?

आरबीआयच्या निर्बंधानंतर  पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर यांनी पेटीएम अॅप सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. पेटीएमच्‍या इतर आर्थिक सेवा जसे कर्ज वितरण आणि विमा वितरण कोणत्याही प्रकारे त्‍यांच्‍या सहयोगी बँकेशी संबंधित नाहीत आणि नेहमीप्रमाणे कार्यरत राहतील, असेही त्यांनी म्हटले. पेटीएमच्‍या ऑफलाइन पेमेंट नेटवर्क ऑफरिंग्‍ज जसे पेटीएम क्‍यूआर, पेटीएम साऊंडबॉक्‍स, पेटीएम कार्ड मशिन नेहमीप्रमाणे कार्यरत राहतील, जेथे त्‍यामध्‍ये नवीन ऑफलाइन मर्चंट्सना देखील ऑनबोर्ड करता येऊ शकते.  पेटीएम अॅपवरील मोबाइल रिचार्जेस्, सबस्क्रिप्‍शन्‍स आणि इतर रिकरिंग पेमेंट्स कार्यरत राहतील अशी माहितीदेखील त्यांनी दिली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget