Sucess Story : गरीब शेतकऱ्याच्या मुलानं खरेदी केलं 100 कोटींचं हेलिकॉप्टर; अंबानी-अदानीच्या पुढे एक पाऊल
Ravi Pillai Sucess Story : केरळमधील शेतकरी कुटुंबात जन्मलेले रवी पिल्लई यांनी मेहनतीच्या जोरावर मोठं यश मिळवलं आहे.
Farmer's Son Bought Helicopter : एका गरीब शेतकरी कुटुंबात (Farmer) जन्मलेल्या व्यक्तीने स्वकष्टाने मेहनत करत 100 कोटी रुपयांचं हेलिकॉप्टर (Helicopter) विकत घेतलं, यानंतर सर्वत्र त्यांची चर्चा होऊ लागली. केरळमध्ये एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेले रवी पिल्लई (B Ravi Pillai) यांनी अत्यंत मेहनत आणि चिकाटीने हे यश मिळवलं आहे. त्यांनी दाखवून दिलं आहे की, फक्त तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्मलेले व्यक्तीच नाही तर, एका सामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्मलेला व्यक्ती सुद्धा आभाळ गाठू शकतो. उद्योगपती (Indian Businessman) रवी पिल्लई (B. Ravi Pillai) आरपी ग्रुप ऑफ कंपनीचे (RP Group of Company) चेअरमन आहेत.
केरळमधील शेतकरी कुटुंबात जन्म
रवी पिल्लई यांचा जन्म केरळमधील शेतकरी कुटुंबात झाला. जून 2022 मध्ये त्यांनी 100 कोटी रुपयांचं हेलिकॉप्टर विकत घेतल्याने ते प्रसिद्धीझोतात आले. रवी पिल्लई यांनी एअरबस एच 145 हेलिकॉप्टर खरेदी केलं. हे हेलिकॉप्टर अदानी आणि अंबानी यांच्याकडेही नाही. हे महागडं हेलिकॉप्टर खरेदी करणार रवी पिल्लई हे पहिले भारतीय आहेत.
रवी पिल्लई यांचं बालपण कसं गेलं?
रवी पिल्लई यांचा जन्म 2 सप्टेंबर 1953 रोजी (Ravi Pillai Birth) केरळमधील (Kerala) कोल्लम जिल्ह्याजवळील चवरा गावामध्ये झाला. शेतीवरच पिल्लई कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. त्यांचे दोन वेळेच्या जेवणासाठीही खूप हाल व्हायचे. इतर कोणतंही उत्पन्नाचं साधन नसल्याने त्यांचं बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेलं. पण, असं असलं तरी त्यांच्या आई-वडिलांनी रवी यांना शिक्षण दिलं. परिस्थिती बेताची असतानाही रवी यांनी मन लावून अभ्यास केला.
शिक्षण सुरु असतानाच पहिला व्यवसाय
स्थानिक कॉलेजमधून पदवी शिक्षण घेतल्यावर त्यांनी कोच्ची विद्यापिठातून (University of Cochin) बिजनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये (Business Administration) पोस्ट ग्रॅज्युएशन (Post Administration) केलं. शिक्षण करतानाच त्यांना हे समजलं होतं की, काहीतरी वेगळं करण्यासाठी व्यवसाय हाच उत्तम मार्ग आहे. शिक्षण सुरु असतानाच त्यांनी सावकाराकडून एक लाख रुपये कर्ज काढत चिट फंड कंपनी सुरु केली. आज रवी पिल्लई यांच्या कंपन्यांमध्ये 70,000 हून अधिक कर्मचारी काम करतात. फोर्ब्सच्या यादीनुसार, रवी पिल्लई यांनी एकूण संपत्ती 3.2 अब्ज डॉलर आहे.
दुबईमध्ये थाटला व्यवसाय
शिक्षण घेत असताना, पिल्लई यांनी कोचीमध्ये एका स्थानिक सावकाराकडून एक लाख रुपये कर्ज घेऊन स्वतःची चिट-फंड कंपनी सुरू केली. या व्यवसायातून पैसे कमवून त्यांनी कर्जाची परतफेड केली आणि नफ्याचे पैसे वाचवले. त्यानंतर त्यांनी स्वतःची बांधकाम कंपनी सुरू केली. त्यांना वेल्लोर हिंदुस्थान न्यूजप्रिंट फॅक्टरीचे कंत्राट मिळालं, पण कामगारांच्या समस्येमुळे त्यांची कंपनी बंद करावी लागली. यानंतरही पिल्लई यांनी हार मानली नाही. 1978 मध्ये पिल्लई भारत सोडून सौदी अरेबियाला गेले. त्यांनी सौदी अरेबियामध्ये बांधकाम व्यवसाय सुरू केला. लवकरच त्यांनी सौदी अरेबियामध्ये 150 लोकांसह नसीर एस. अल हजरी नावाची स्वतःची बांधकाम कंपनी सुरू केली.
बांधकाम व्यवसायासह 'या' क्षेत्रातही पसरलं जाळं
यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. जगातील मोठमोठ्या कंपन्यांकडून त्यांना कंत्राटे मिळत गेली आणि त्याचा बांधकाम व्यवसाय दिवसागणिक वाढत गेला. त्यांचा व्यवसाय आता फक्त बांधकाम व्यवसायापर्यंत मर्यादित नसून आलिशान हॉटेल्स, स्टील, गॅस, सिमेंट आणि शॉपिंग मॉल्सपर्यंत पसरला आहे.
विविध पुरस्काराने सन्मानित
रवी पिल्लई यांना 2010 मध्ये पद्मश्री आणि 2008 मध्ये प्रवासी भारतीय सन्मानाने सन्मानित करण्यात आलं होतं. द रविझ अष्टमुडी (The Raviz Ashtamudi), द रविझ कोवलम (The Raviz Kovalam) आणि द रविझ कडवू (The Raviz Kadavu) यासारखी अनेक पंचतारांकित हॉटेल्स त्यांच्या मालकीची आहेत. जगभरातील अनेक शहरांमध्ये त्यांची मालमत्ता आहे. अनेक बँका आणि रिअल इस्टेटमध्येही त्यांची हिस्सेदारी आहे. केरळमधील कोल्लम येथे त्यांच्या मालकीचं 300 खाटांचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देखील आहे.
रवी पिल्लई यांची संपत्ती
उद्योगपती रवी पिल्लई यांची कंपनी मध्य भारतातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. 2015 मध्ये पिल्लई यांच्या मुलीचं लग्न झालं, ज्याची खूप चर्चा झाली. या लग्नसमारंभात 42 देशांमधून सुमारे 30,000 हून अधिक पाहुणे सहभआगी झाले होते. हा केरळमधील सर्वात भव्य लग्न सोहळा मानला जातो. या विवाहसोहळ बाहुबली चित्रपटाच्या प्रोडक्शन डिझायनरने आयोजित केला होता. जगातील सर्वात श्रीमंत 1000 श्रीमंतांच्या यादीत रवी पिल्लई यांचा समावेश होतो. उद्योगपती रवी पिल्लई यांची एकूण संपत्ती 3.2 अब्ज डॉलर आहे.