एक्स्प्लोर

Rasana Founder: 'रसना' कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष अरीज खंबाटा यांचे निधन

Areez Pirojshaw Khambatta passes away: रसना कंपनीचे संस्थापक अरीज पिरोजशॉ खंबाटा यांचे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्रातील एका पर्वाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Rasana Founder Areez Khambatta Passes Away: 'रसना' कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष अरीज पिरोजशॉ खंबाटा (Areez Pirojshaw Khambatta passes away) यांचे शनिवारी निधन झाले. कंपनीने याबाबतची अधिकृत माहिती दिली. ते 85 वर्षांचे होते. 'रसना' शीतपेयाने  मागील अनेक दशके भारतीयांचा उन्हाळा सुसह्य केलाच शिवाय घरगुती कार्यक्रमात पाहुण्यांची तहान भागवली. भारतासह इतर देशांमधील बाजारपेठेत आजही रसनाला मागणी आहे. अरीज खंबाटा हे अरीज खंबाटा बेनेवॉलेंट ट्रस्ट आणि रसना फाउंडेशनचे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनाने उद्योग आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. 

रसना ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार, खंबाटा यांनी भारतीय उद्योग, व्यवसाय आणि समाजसेवेच्या माध्यमातून सामाजिक विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. अरीज खंबाटा हे अहमदाबाद पारशी पंचायतीचे माजी अध्यक्ष होते. त्याशिवाय पारशी-इराणी झोराष्ट्रीयन समुदायाची संघटना असलेल्या WAPIZ या संघटनेचेही अध्यक्ष होते. खंबाटा हे रसना या लोकप्रिय घरगुती शीतपेयासाठी ओळखले जातात. सध्या देशात 18 लाख किरकोळ दुकानांवर रसनाची विक्री होते.

रसना ग्रुपने शोक व्यक्त करताना म्हटले की, खंबाटा यांनी केलेल्या मेहनत आणि प्रयत्नांमुळे, देशात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे हजारो नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.  फळांवर आधारित उत्पादने विकसित केल्यामुळे लाखो शेतकर्‍यांना त्याचा फायदा झाला. देशभरातील शेतकऱ्यांना एक बाजारपेठ उपलब्ध झाली, शिवाय शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळाला, असे कंपनीने म्हटले. रसना कंपनीकडून विविध उत्पादने तयार केली जात असून देशात आणि परदेशात त्याला चांगली मागणी आहे. 

घरा-घरात रसना लोकप्रिय

खंबाटा यांनी 1970 दशकात महागड्या शीतपेयांना पर्याय म्हणून रसना या प्रोडक्टची सुरुवात केली. 'स्वस्तात मस्त' शीतपेय म्हणून रसना अल्पावधीतच देशभरात लोकप्रिय झाला. कधीकाळी अवघ्या पाच रुपयांच्या पॅकेटमध्ये रसनाचे 32 ग्लास तयार होत असे. सध्या रसना या ब्रॅण्डचे शीतपेय जगभरातील 60 देशांमध्ये विकले जाते. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या शीतपेय बाजारपेठेतील मक्तेदारीला रसनाने आव्हान दिले. 'मेड इन इंडिया' उत्पादन असलेल्या रसना या शीतपेयाला समाजातील सर्वच स्तरातील लोकांकडून भरभरून प्रतिसाद लाभला. अनेकांच्या बालपणीच्या आठवणीदेखील रसनाशी जोडल्या गेल्यात. 

समाजसेवेत ही अग्रसेर

खंबाटा उद्योग क्षेत्रासह हे सामाजिक कार्यातही अग्रसेर होते. वाणिज्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना नॅशनल सिटीझन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याशिवाय, सिव्हिल डिफेन्स मेडल, पश्चिमी स्टार, समरसेवा, संग्राम मेडल्स आदी पुरस्काराने त्यांनी सन्मानित करण्यात आले होते. विविध संस्था, धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून ते समाजसेवा करत होते. 

महत्त्वाच्या बातम्या

Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
सरकारी नोकरीची मोठी संधी, कोणतीही परीक्षा न देता RBI मध्ये मिळवा नोकरी, जाणून घ्या सविस्तर माहिती  
सरकारी नोकरीची मोठी संधी, कोणतीही परीक्षा न देता RBI मध्ये मिळवा नोकरी, जाणून घ्या सविस्तर माहिती  
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
EPFO :  ईपीएफओची वेबसाईट अखेर सुरु, UAN संदर्भात मोठा बदल, यूएएन तयार करणे,सक्रिय करण्याची सुविधा वेबसाईटवरुन बंद
मोठी अपडेट, UAN संदर्भात मोठा बदल, यूएएन तयार करणे, सक्रिय करण्याची सुविधा EPFO च्या वेबसाईटवरुन बंद

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Raigad Rain Rice Farming: चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
Embed widget